सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणार पगार, 80 हजारांनी सुरुवात, 'इथे' आहे संधी

सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणार पगार, 80 हजारांनी सुरुवात, 'इथे' आहे संधी

DRDO, Jobs - तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर चांगली संधी आहे

  • Share this:

मुंबई, 13 ऑगस्ट : चांगली नोकरी आणि शानदार पॅकेज हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी Defence Research and Development Organisation (drdo) देतेय. डीआरडीओ एकूण 290 शास्त्रज्ञांच्या पदावर भरती करणार आहे. यात सायन्टिस्ट बी, इंजिनीयर आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनीयर या पदांवर भरती केली जाणार आहे. या पदांवर निवड होणाऱ्या उमेदवाराला सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार दिला जाईल. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी rac.gov.in इथे अर्ज करावा. भरती झाल्यावर पगार असेल 80 हजार रुपये.

पद आणि पद संख्या

एकूण पदं - 290

सायन्टिस B डीआरडीओ - 270

सायन्टिस/इंजिनीयर B - 10

सायन्टिस B डीएसटी - 6

एक्झिक्युटिव्ह इंजिनीयर - 4

CA Result : आज घोषित होणार CA चा निकाल? icai.org या साईटवर जाहीर होणार

ITR भरल्यानंतर पासवर्ड विसरलात तर लाॅग इन न करता 'असं' करा व्हेरिफिकेशन

तसंच राज्य सरकार लवकरच रोजगार निर्मिती करतंय.राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सरकार लवकरच रोजगाराची योजना सुरू करतेय. चिफ मिनिस्टर एम्पलाॅयमेंट जनरेशन प्रोग्राम ( CMEGP ), मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेअंतर्गत पुढच्या 5 वर्षात 10 लाख नोकऱ्या निर्माण केल्या जातील. या योजनेअंतर्गत 10 हजार अति छोट्या, लहान आणि मध्यम आकाराच्या इंडस्ट्रियल युनिटला प्रत्येकी 15 लाख रुपये दिले जातील. त्याबदल्यात दर वर्षी या उद्योगांकडून 2 लाख नोकऱ्या दिल्या जातील.

आधार कार्डाच्या मदतीनं 'अशी' बुक करा ट्रेनची तिकिटं, 'असा' होतो फायदा

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेवरूनच या योजनेनं प्रेरणा घेतलीय. या योजनेत महाराष्ट्रातून 16 हजारांनी अर्ज केलेत. खरं तर लक्ष्य होतं 5 हजाराचं. याचा अर्थ बेरोजगारांची संख्या जास्त आहे. उद्योगखात्यानं मिळवलेल्या माहितीनुसार जवळजवळ 40 लाख बेरोजगार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत बऱ्याच जणांना नोकरीची संधी आहे.

VIDEO : भाजपच्या नगरसेविकेची गुंडगिरी, पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या मराठा संघाच्या कार्यकर्त्यांना मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: jobs
First Published: Aug 13, 2019 05:15 PM IST

ताज्या बातम्या