ग्रॅज्युएट्सना बँकेत नोकरीची संधी, पदासाठी आहेत किमान 'या' अपेक्षा

ग्रॅज्युएट्सना बँकेत नोकरीची संधी, पदासाठी आहेत किमान 'या' अपेक्षा

JDCC Bank Recruitment 2019 - बँकेत नोकरी हवी असेल तर चांगली संधी आहे. त्याबद्दल घ्या जाणून

  • Share this:

मुंबई, 02 ऑगस्ट : तुम्हाला बँकेत नोकरी हवी असेल तर एक संधी आहे. ती म्हणजे जळगावमध्ये जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेत व्हेकन्सी आहे. इथे 220 पदांवर नियुक्त्या केल्या जातील. योग्य आणि इच्छुक उमेदवारांनी JDCC बँकेच्या jdccbank.com या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.

या पदांसाठी 20 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकता. 20 ऑगस्टपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. या पदासाठी अर्ज केल्यानंतर ऑनलाइन प्रिंटआउट घेण्याची शेवटची तारीख आहे 4 सप्टेंबर. या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेकडून 50 टक्के मार्क मिळवून पदवीधर हवा. उमेदवाराचं वय 21 ते 30 वर्षाच्या आत हवं.

'अशा' प्रकारे भरू शकता फक्त 7 मिनिटांत ITR, इन्कम टॅक्सची नवी सुविधा

अशी होईल निवड

उमेदवाराची निवड दोन भागांत होणाऱ्या परीक्षेनं होईल. पहिल्यांदा ऑनलाइन लिखित परीक्षा आणि नंतर इंटरव्ह्यू घेऊन निवड होईल.

तसंच, इंटरनॅशनल इन्स्टिट्युट फाॅर पाॅप्युलेशन (IIPS ) म्हणजेच आंतरराष्ट्रीय लोकसंख्या संस्था इथे नोकरीची चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी या पदासाठी 16 ऑगस्टपर्यंत अर्ज करावा. ही भरती फॅमिली हेल्थ सर्वेसाठी होतेय. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून याला मदत मिळतो.

मोदी सरकारला धक्का! भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक स्तरावर मोठी घसरण

या पदासाठी एकूण 15 जागा आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे Demography/Mathematics/ Statistics/Social Sciences यात M.Philची पदवी हवी. शिवाय दोन वर्षांचा कामाचा अनुभव हवा. किंवा IIPS सोबत मास्टर ऑफ पाॅप्युलेशन स्टडीजबरोबर एक वर्ष कामाचा अनुभव हवा.

याशिवाय फिल्डवर कामाचा अनुभव हवा. निवड झालेल्या उमेदवाराला फिल्ड वर्क करावं लागेल. शिवाय माॅनिटरिंग आणि सुपरविजनचं काम दिलं जाईल. त्याला IIPSला नियमित रिपोर्टिंग करावं लागेल.

सरकारनं 'या' पदासाठी मागवलेत अर्ज, महिना 2.25 लाख रुपये पगार

उमेदवाराला आपला CV, पदवी प्रमाणपत्र, फोटो आणि इतर डाॅक्युमेंट्स nfhs5adm@gmail.com वर ईमेल करावे लागतील. उमेदवाराला कव्हरिंग लेटर लिहावं लागेल. त्यात सब्जेक्ट असेल Application for ‘Post Name’ vide advertisement no: IIPS/NFHS-5/13/2019. तसं नमूद करावं लागेल.

अमित शहांचा उदयनराजेंना फोन, संपूर्ण कॉल रेकॉर्डचा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: jobs
First Published: Aug 2, 2019 05:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading