मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

10 वी नापासही करू शकणार परदेशात नोकरी, पाहा कोणत्या क्षेत्रात आहे संधी

10 वी नापासही करू शकणार परदेशात नोकरी, पाहा कोणत्या क्षेत्रात आहे संधी

Indian Worker demand : कोरोनाच्या आधी परदेशात कामासाठी जाणाऱ्या भारतीयांची संख्या बरीच होती. कोरोनानंतर मात्र यात दुप्पट वाढ झाली आहे.

Indian Worker demand : कोरोनाच्या आधी परदेशात कामासाठी जाणाऱ्या भारतीयांची संख्या बरीच होती. कोरोनानंतर मात्र यात दुप्पट वाढ झाली आहे.

Indian Worker demand : कोरोनाच्या आधी परदेशात कामासाठी जाणाऱ्या भारतीयांची संख्या बरीच होती. कोरोनानंतर मात्र यात दुप्पट वाढ झाली आहे.

मुंबई, 16 ऑगस्ट :  भारतात बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. उच्चशिक्षित तरुणही शिपाई पदाच्या नोकरीसाठी अर्ज करताना पाहायला मिळतात. देशात बेरोजगारी वाढत असली तरी भारतीय कामगार, नोकरदारांना परदेशात नोकरीच्या अमाप संधी आहेत. त्यामुळे नोकरीच्या निमित्तानं परदेशात जाणाऱ्या भारतीयांची संख्या सातत्यानं वाढत आहे. भारतीय लोकांना परदेशात चांगला पगार मिळत असल्याने साहजिकच तिकडं ओढा जास्त दिसतो. ‘टीव्ही 9 हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. जगातील 18 देशांमध्ये भारतीय कामगारांना चांगलीच मागणी आहे. कोरोनाच्या आधी परदेशात कामासाठी जाणाऱ्या भारतीयांची संख्या बरीच होती. कोरोनानंतर मात्र यात दुप्पट वाढ झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्था सावरत असल्याचं हे चिन्ह आहे, असंही मानलं जातंय. भारतीय कामगारांना मागणी परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं परदेशात जाणाऱ्या भारतीयांची आकडेवारी जाहीर केली गेली आहे. यात म्हटलं आहे की, कोरोना महामारीच्या आधी 2019 मध्ये 94 हजार भारतीय नागरिक परदेशात कामासाठी गेले होते. आता या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या 1.90 लाख भारतीय कामगार परदेशात कामासाठी गेले आहेत. जगातील 18 देशांमध्ये भारतीय कामागारांना चांगली मागणी आहे. या देशांत जाण्यासाठी इमिग्रेशन चेक रिक्वायर्ड (ECR) पासपोर्टची आवश्यकता असते. ईसीआर पासपोर्ट काढणंही तसं सोप आहे. बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी पैसे नाहीत? मग 'हे' पार्ट टाइम जॉब्स तुमच्यासाठी ठरतील टर्निंग पॉईंट ईसीआर पासपोर्ट म्हणजे काय?  दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या कामगारांना ईसीआर पासपोर्ट देण्यात येतो. पासपोर्ट कार्यालयाच्या वतीनं विशेष शिक्का मारून ईसीआर पासपोर्ट मंजूर केला जातो. हा पासपोर्ट भारतीय कामगार ईसीएनआर या श्रेणीत (Category) मोडतो. महत्त्वाचं म्हणजे, ईसीआर पासपोर्ट बाळगणाऱ्या कामगारांसाठी कामाचे नियम कठोर नसतात. या कामागारांना ई-मायग्रेट प्रणालीपासून दूर ठेवण्यात आलंय. त्यांना प्लंबर, इलेक्ट्रिशियनसारख्या जास्त अंगमेहनतीचं काम असणाऱ्या क्षेत्रांत काम करावं लागतं. कोरोनाच्या काळात जवळपास सर्वच क्षेत्रांना फटका बसला. दरवर्षी भारतातून परदेशात कामासाठी जाणाऱ्यांची संख्या तशी बरीच असते. कोरोना काळात परदेशात जाणाऱ्या कामागारांची संख्या कमी झाली होती. पण जसजसं जगातील बाजारपेठ खुली होत आहे तसतसं भारतीय कामागारांची मागणीही वाढत आहे. विशेष म्हणजे, भारतीय कामगार जेव्हा कामाच्या निमित्ताने परदेशात जातात तेव्हा देशालाही त्याचा चांगला फायदा होतो. कारण कामावर गेल्यानंतर तिथून कामगार त्यांच्या कुटुंबीयांना भारतात पैसे पाठवतात. एका अर्थाने ही सरकारलाही मदत ठरते. ESIC मध्ये जॉबची ही सुवर्णसंधी सोडणं परवडणारच नाही; 'या' पदांसाठी आताच करा अप्लाय मागील वर्षी परदेशातील भारतीयांनी 87 अब्ज डॉलर देशात पाठवले होते. जागतिक आरोग्य संघटनेनं एका रिपोर्टमध्ये म्हटलंय की, परदेशातून भारतीय नागरिकांकडून पाठवल्या जाणाऱ्या पैशांच्या बाबतीत भारत देश आघाडीवर आहे.
First published:

Tags: Job, Job alert

पुढील बातम्या