Home /News /career /

Career After 12th: 12वीनंतर भरघोस पैसे कमवायचे आहेत? मग 'या' क्षेत्रांमध्ये करिअर कराच

Career After 12th: 12वीनंतर भरघोस पैसे कमवायचे आहेत? मग 'या' क्षेत्रांमध्ये करिअर कराच

या क्षेत्रांमध्ये करिअर करून भरघोस पैसे कमवू शकता.

या क्षेत्रांमध्ये करिअर करून भरघोस पैसे कमवू शकता.

आज आम्ही तुम्हाला अशा काही क्षेत्रांबद्दल (Best sectors or jobs after 12th) माहिती देणार आहोत ज्यामध्ये तुम्ही बारावीनंतर करिअर (Career after 12th) करू शकता

    मुंबई, 27 जानेवारी: आजकाल अनेक विद्यार्थ्यांना लगेच पैसे कमवण्याची (How to earn instant Money) इच्छा असते. यासाठी त्यांना अधिक वेळ वाटही बघायची नसते. दहावी किंवा बारावी झाल्यानंतर त्यांना लगेच जॉब (Jobs after 10th and 12th) हवा असतो. घरची आर्थिक परिस्थिती यामागची एक प्रमुख कारण असू शकतं. बारावीनंतर हे शक्य आहे. आता तुम्ही बारावी उत्तीर्ण केल्यांनतर नक्की कोणत्या क्षेत्रात career करायचं या प्रश्नाला घेऊन चिंतीत असाल तर ता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला अशा काही क्षेत्रांबद्दल (Best sectors or jobs after 12th) माहिती देणार आहोत ज्यामध्ये तुम्ही बारावीनंतर करिअर (Career after 12th) करू शकता. तसंच या क्षेत्रांमध्ये करिअर करून भरघोस पैसे कमवू शकता. चला तर मग जाणून घेऊया. इंश्युरन्स क्षेत्र (Insurance Sector)   आजकाल विम्याला मोठी मागणी आहे. यासोबतच या क्षेत्रात नोकऱ्यांचेही (Career options in Insurance sector) मार्ग खुले झाले आहेत. विमा, बँकिंग, आयटी क्षेत्र, बहुराष्ट्रीय कंपन्या, वित्तीय कंपन्या इत्यादींमध्ये संधी मिळू शकतात. कंपनीद्वारे जोखीम व्यवस्थापनाचे विश्लेषण करण्यासाठी बीपीओ मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकांची नियुक्ती करतात. विमा क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करणाऱ्या उमेदवारांना त्यात उपलब्ध असलेल्या पगाराचीही कल्पना असायला हवी. येथे फ्रेशर्स म्हणून दरमहा 20 ते 30 हजार रुपये सहज कमावता येतात. मोठ्या पदावर गेल्यावर महिन्याला एक लाख रुपयेही मिळू शकतात. MPSC Guide: पूर्वीच्या चुकांमधून घ्या बोध आणि Crack करा MPSC परीक्षा; अशी करा बेस्ट तयारी अॅक्च्युरिअल सायन्स (Actuarial Science) अॅक्च्युरिअल सायन्समध्ये ग्रॅज्युएशन करण्यासाठी, गणित किंवा सांख्यिकीमध्ये 55% गुणांसह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विद्यार्थी इन्स्टिट्यूट ऑफ ऍक्च्युरीज ऑफ इंडियाचे सदस्य म्हणून देखील सामील होऊ शकतात. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी लोकांच्या समस्या समजून घेणे, न डगमगता नवीन तंत्रज्ञान शिकणे आणि संवादाबरोबरच गणित आणि आकडेवारीवरही पकड असणे आवश्यक आहे. फोटोग्राफी क्षेत्र फोटोग्राफी हा करिअरचा नेहमीच मागणी करणारा पर्याय (Career in Photography sector) राहिला आहे. आधुनिक आणि डिजिटल कॅमेऱ्यांच्या आगमनाने छायाचित्रण करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. फोटोग्राफी हा केवळ ग्लॅमरस करिअरचा पर्याय नाही तर त्यातून चांगले नाव आणि पैसाही कमावता येतो. डिजिटल मीडियामुळे आता प्रत्येकाला छायाचित्र काढून लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे आहे. अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये फोटोग्राफीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रमापासून ते पदवीपर्यंतचे अभ्यासक्रम सुरू आहेत. तुम्हालाही फोटोग्राफीची आवड असेल आणि या क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर तुम्ही यापैकी कोणत्याही अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन करिअर करू शकता.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Jobs, Tips

    पुढील बातम्या