Home /News /career /

रेल्वेतील 1 लाख 40 हजार पदांच्या भरतीसाठी 15 डिसेंबरपासून परीक्षा

रेल्वेतील 1 लाख 40 हजार पदांच्या भरतीसाठी 15 डिसेंबरपासून परीक्षा

कोरोनाच्या (Corona) पार्शवभूमीवर देशात तसेच राज्यातील बऱ्याच परीक्षा (Examination) रखडल्या आहेत. पण रेल्वेच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (Students) आनंदाची बातमी आहे. रेल्वेतील 1 लाख 40 हजार पदांच्या भरतीसाठी येत्या 15 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 11 डिसेंबर :  कोरोनाच्या (Covid-19) पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी बेरोजगारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यातच अनेक सुशिक्षित तरुण सध्या चांगल्या नोकरीच्या संधी शोधताहेत. अशा युवकांसाठी रेल्वे भरती बोर्डाने रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करुन दिली आहे. रेल्वे विभागात 1 लाख 40 हजार 640 पदांची भरती होणार आहे. त्यासाठीच्या परीक्षांना येत्या 15 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. यानिमित्ताने सुशिक्षित बेरोजगार युवकांना शासकीय नोकरीची संधी मिळणार आहे. देशभरात रेल्वेचे मोठे जाळे विस्तारले आहे. दळणवळणाचे एक प्रमुख साधन म्हणून रेल्वेला प्राधान्य दिले जाते. रेल्वेचा विस्तार पाहता या विभागाला मोठे मनुष्यबळ आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदभरती केली जात आहे. रेल्वे भरती बोर्डाने (RRB) यापूर्वीच पदभरती करण्यासंदर्भात घोषणा केली होती. या भरतीसाठीच्या परीक्षांना 15 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. रेल्वे भरती बोर्डाच्या वतीने विविध पदांसाठी वेगवेगळ्या तारखांना परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षांच्या माध्यमातून रेल्वे विभागात तब्बल 1 लाख 40 हजार 640 पदे भरली जाणार आहेत. त्यासाठीचे नियोजन सुरू झाले आहे. रेल्वे भरती बोर्डतील (Railway Recruitment Board), स्टेनो आणि अध्यापक श्रेणीतील 1663 पदांच्या भरतीसाठी 15 ते 18 डिसेंबरदरम्यान परीक्षांचे आयोजन करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पदांसाठी 1 लाख 03 हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या व्यतरिक्त गार्ड, स्टेशन मास्तर, ऑफिस क्लार्क (Office Clerk), कर्मिशिअल क्लार्क (Commercial Clerk) आदी 35208 पदांसाठी 28 डिसेंबर ते पुढील वर्षी मार्च दरम्यान परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याच बरोबर ट्रॅक मेन्टेनन्स, पाईंटन्स मन आदी 1 लाख 3 हजार 769 पदांसाठी 15 एप्रिल ते जून 2021 दरम्यान परीक्षांचे आयोजन करण्यात येईल. रेल्वे भरती बोर्डाकडून 1 लाख 40 हजार 640 पदांच्या भरतीसाठी घोषणा करण्यात आली असून याकरिता 2 कोटी 44 लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Government employees, Indian railway, Job, Railway jobs, Unemployment

पुढील बातम्या