आनंदाची बातमी : थेट रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी, 322 जागांसाठी भरती सुरू

आनंदाची बातमी : थेट रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी, 322 जागांसाठी भरती सुरू

रिझर्व्ह बँकेत (Reserve Bank of India) मोठी भरती प्रक्रिया (Recruitment In RBI) सुरू झाल्याने संबंधित क्षेत्रातील तरुणांना दिलासा मिळाला आहे.

  • Share this:

मुंबई, 01 फेब्रुवारी : कोरोना काळात अनेक तरुणांच्या नोकरीवर गदा आली. तसंच उद्योग-धंद्यांची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने रोजगाराच्या शोधात असणाऱ्या तरुणांची प्रतीक्षा वाढली आहे. मात्र अशातच रिझर्व्ह बँकेत (Reserve Bank of India) मोठी भरती प्रक्रिया (Recruitment In RBI) सुरू झाल्याने संबंधित क्षेत्रातील तरुणांना दिलासा मिळाला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेत 322 जागांसाठी भरती

ग्रेड ‘बी’ ऑफिसर (डीआर) – जनरल – 270 जागा

शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह पदवी (अजा/अज/दिव्यांग 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (अजा/अज/दिव्यांग : उत्तीर्ण श्रेणी)

ग्रेड ‘बी’ ऑफिसर (डीआर) – डीईपीआर – 29 जागा

शैक्षणिक पात्रता : अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स / परिमाणात्मक अर्थशास्त्र / गणितीय अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा 55% गुणांसह पीजीडीएम/एमबीए (फायनान्स) किंवा 55% गुणांसह अर्थशास्त्रातील कोणत्याही उप-वर्गातील अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी (अजा/अज/दिव्यांग 50% गुण)

ग्रेड ‘बी’ ऑफिसर (डीआर) – डीएसआयएम – 23 जागा

शैक्षणिक पात्रता : आयआयटी-खडगपूर मधून सांख्यिकी / गणितीय सांख्यिकी / गणितीय अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स / सांख्यिकी आणि माहितीशास्त्र या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी /आयआयटी-बॉम्बे मधून एप्लाइड सांख्यिकी आणि इकोनोमेट्रिक्स पदव्युत्तर पदवी किंवा 55% गुणांसह गणितातील पदव्युत्तर पदवी आणि एक वर्षातील सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर पदविका किंवा आयआयटी कोलकाता, आयआयटी खडगपूर आणि आयएसआय कोलकाता 55% गुणांसह बिझिनेस एनालिटिक्स (PGDBA) पदव्युत्तर डिप्लोमा किंवा समतुल्य. (अजा/अज/दिव्यांग : 50% गुण)

वयोमर्यादा : 1 जानेवारी 2021 रोजी 21 ते 30 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2021

Published by: Akshay Shitole
First published: February 1, 2021, 7:38 AM IST

ताज्या बातम्या