खूशखबर : MIDC मध्ये नोकरीच्या संधी, या तारखेपर्यंत भरा अर्ज

खूशखबर : MIDC मध्ये नोकरीच्या संधी, या तारखेपर्यंत भरा अर्ज

महाऱाष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच MIDC मध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. MIDC ने अर्ज भरण्यासाठीची मुदत वाढवली असून आता 26 ऑगस्ट 2019 पर्यंत अर्ज भरता येतील.

  • Share this:

मुंबई, 22 ऑगस्ट : महाऱाष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच MIDC मध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. यासाठी शिक्षणाची अटही अगदी मर्यादित आहे. तुम्ही जर सातवी पास असाल आणि तुमच्याकडे खास कौशल्य असेल तर MIDC च्या नोकरीसाठी अर्ज करू शकता.

MIDC मध्ये बऱ्याच पदांसाठी जागा रिकाम्या आहेत. तुमच्याकडे इंजिनिअरगिंचा डिप्लोमा असेल तर ज्युनिअर इंजिनिअर पदासाठीही अर्ज करू शकता.स्टेनोग्राफर, सर्व्हेअर, टेक्निकल असिस्टंट, पंप ड्रायव्हर, इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हर, शिपाई आणि हेल्परच्या पदांसाठीही भरती होणार आहे. यासाठी इच्छुक आणि योग्य उमेदवार MIDC ची अधिकृत वेबसाइट midcindia.org वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात. MIDC ने अर्ज भरण्यासाठीची मुदत वाढवली असून आता 26 ऑगस्ट 2019 पर्यंत अर्ज भरता येतील.

एमआयडीसी (MIDC) ने एकूण 865 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. हे अर्ज भरताना शैक्षणिक पात्रतेचे निकष नीट पाहावेत, असंही MIDC ने म्हटलं आहे.

ही कंपनी पुढच्या 6 महिन्यांत 3 हजार जणांना देणार नोकरी

या पदांसाठी करा अर्ज

- ज्युनिअर इंजिनिअर, स्टेनोग्राफर, सर्व्हेअर, टेक्निकल असिस्टंट, पंप ड्रायव्हर, इलेक्‍ट्रेशियिन, ड्रायव्हर, शिपाई, हेल्‍पर

शैक्षणिक पात्रता

ड्रायव्हर - सातवी पास आणि ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक

ज्युनिअर इंजिनिअर - सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा

ज्युनियर इंजिनिअर- इलेक्‍ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा

शेअर बाजार आणि FD ऐवजी इथे गुंतवा पैसे, मिळेल बंपर नफा

========================================================================================

VIDEO : आदित्य ठाकरे पोहोचले सांगलीत, केली सरसकट कर्जमाफीची मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2019 04:52 PM IST

ताज्या बातम्या