नॅशनल हायड्रॉलिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांसाठी भरती; तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी

या पदांसाठी उमेदवारांनी आयटीआयसह दहावी उत्तीर्ण केलेली असावी

या पदांसाठी उमेदवारांनी आयटीआयसह दहावी उत्तीर्ण केलेली असावी

  • Share this:
    नवी दिल्ली, 21 जून : नॅशनल हायड्रॉलिक पॉवर कॉर्पोरेशनने (National Hydraulic Power Corporation) अप्रेंटीस (Apprentice Jobs) पदांसाठी अर्ज मागविले आहेत. अधिसूचनेनुसार, ट्रेड अ‍ॅप्रेंटिसच्या एकूण 11 रिक्त जागा आहेत. या नोकरीत रस असणारे उमेदवार नॅशनल हायड्रॉलिक पॉवर कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाइट nhpc.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै आहे. या पदांसाठी उमेदवारांनी आयटीआयसह दहावी उत्तीर्ण केलेली असावी. गुणवत्तेच्या आधारे पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या आहेत जागा इलेक्ट्रीशियन (Electrician)- 05 प्लंबर (plumber) - 01 संगणक ऑपरेटर व प्रोग्रामिंग सहाय्यक (Computer Operator) -  03 स्टेनोग्राफर (Stenographer) आणि सचिवालय सहाय्यक - 03 हे वाचा - तुम्हीपण Fresher आहात? Resume कसा तयार करायचा माहिती नाहीये? फॉलॉ करा या टिप्स शैक्षणिक पात्रता इच्छुक उमेदवार हे दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच त्यांनी ITI चा अभ्यास पूर्ण केला असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा मेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे असणे आवश्यक आहे. SC / ST साठी पाच वर्षे, OBC साठी तीन वर्षे आणि शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्यांसाठी 10 वर्षांची सवलत असेल. अशी असेल निवड प्रक्रिया आयटीआय व दहावीच्या गुणांमधील गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. apprenticeshipindia.org या वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published: