• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • महिना 7 लाख रुपये पगार, आवडीचं काम, राहणं-खाणंही फ्री; या कंपनीची जबरदस्त नोकरी

महिना 7 लाख रुपये पगार, आवडीचं काम, राहणं-खाणंही फ्री; या कंपनीची जबरदस्त नोकरी

एक अशी कंपनी आहे, जिथे जबरदस्त सॅलरीसह इतर अनेक सुविधाही दिल्या जातात. एवढंच नाही, तर कर्मचारी आपल्या मनाप्रमाणे कामही करू शकतात. नुकतंच, कंपनीने या शानदार ऑफरसह जॉब वॅकेन्सीही काढल्या आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 मार्च : जगात अशा काही कंपन्या आहेत, जिथे काम करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. कारण तेथे कर्मचाऱ्यांना लक्झरी सुविधा दिल्या जातात. लक्झरी सुविधांच्या बदल्यात कंपन्या कर्मचाऱ्यांना आपल्या हिशोबाने काम करायला लावतात. परंतु एक अशी कंपनी आहे, जिथे जबरदस्त सॅलरीसह इतर अनेक सुविधाही दिल्या जातात. एवढंच नाही, तर कर्मचारी आपल्या मनाप्रमाणे कामही करू शकतात. नुकतंच, कंपनीने या शानदार ऑफरसह जॉब वॅकेन्सीही काढल्या आहेत. Murphy Goode Winery असं या कंपनीचं काम आहे. या कंपनीने आपल्या जॉब वॅकेन्सी सुरू केल्या आहेत. ज्याअंतर्गत कर्मचाऱ्यांना सात लाख 24 हजार रुपये महिना वेतन दिलं जाणार आहे. त्याशिवाय कर्मचाऱ्यांना फ्रीमध्ये राहणं आणि जेवणही दिलं जाईल. ही नोकरी केवळ एक वर्षासाठी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियाच्या सोनोमा स्थित या कंपनीमध्ये ज्या कोणाला नोकरी मिळेल, त्याला वायनरीमध्ये आपल्या पसंतीचं काम करण्याची संधी दिली जाईल.

  (वाचा - घरबसल्या असं मिळवा तुमचं डिजिटल Voter ID; जाणून घ्या प्रक्रिया)

  जबरदस्त आहे ऑफर - मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कंपनीमध्ये नोकरी करणाऱ्या व्यक्तीला आपल्या आवडीनुसार, पॅशननुसार, स्वत: च्या मनाप्रमाणे काम करण्याची संधी मिळेल. सुरुवातीच्या काही महिन्यांपर्यंत कर्मचाऱ्यांना वायनरीमध्ये सर्व प्रकारची कामं करावी लागतील आणि कर्मचाऱ्यांना यासाठीचं ट्रेनिंगही देण्यात येईल. ज्यावेळी कर्मचारी वायनरीमध्ये गोष्टी चांगल्या प्रकारे समजू लागतील, त्यानंतर त्यांना आपल्या आवडीनुसार, पॅशननुसार काम करण्याची संधी मिळेल. तसंच सर्व कर्मचाऱ्यांना ई-कॉमर्सबाबतही माहिती दिली जाईल. त्याशिवाय वेगवेगळ्या टीमसोबत कर्मचाऱ्यांना कम्युनिकेशनही करावं लागेल.

  (वाचा - या ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन केल्यास होणार 1 वर्ष जेल,भरावा लागेल 10000 रुपये दंड)

  जे लोक या जॉबसाठी अप्लाय करतील, त्यांचं वय कमीत-कमी 21 वर्ष आणि त्याहून अधिक असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवाराकडे अमेरिकेत काम करण्यासाठीची मंजुरीही असणं गरजेचं आहे. इच्छुक उमेदवारांना स्वत:बद्दलची सर्व माहिती व्हिडीओ रेज्युमेअंतर्गत पाठवावी लागेल. संपूर्ण तपासानंतरच या नोकरीसाठी उमेदवाराची निवड केली जाईल. येथे जॉब करण्यासाठी 30 जूनपूर्वी अप्लाय करावं लागेल. अधिक माहितीसाठी कंपनीच्या वेबसाईटवर माहिती घेता येऊ शकते.
  Published by:Karishma Bhurke
  First published: