फूड काॅर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, पगार महिन्याला दीड लाख

फूड काॅर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, पगार महिन्याला दीड लाख

Food Corporation of India Recruitment : इंजिनियर्ससाठी नोकरीची संधी आहे

  • Share this:

मुंबई, 27 जुलै : फूड काॅर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी आहे. जनरल मॅनेजर पदासाठी अर्ज मागवलेत. इच्छुक उमेदवारांनी 19 ऑगस्टच्या आधी अर्ज करावा. या पदांसाठी मुंबई, दिल्ली, कोलकत्ता आणि गुवाहाटी इथे व्हेकन्सी आहे. इंजिनियर्सनाच या नोकरीत प्राधान्य मिळेल.

पदाबद्दल माहिती - ट्रान्सफर डेप्युटेशन, पर्मनंट अॅब्जाॅर्प्शनमध्ये जनरल मॅनेजरची दोन पदं रिकामी आहेत. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता आणि गुवाहाटी इथे नोकरी असेल.

ATM मधून फक्त पैसे नाहीत तर 'या' 8 सेवाही मोफत मिळतात

शैक्षणिक पात्रता - जनरल मॅनेजर पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्युटची civil/electrical/mechanical इंजिनियरिंगची डिगरी हवी. सोबत 10 वर्ष काम केल्याचा अनुभव हवा. त्यात 5 वर्ष एक्झिक्युटिव्ह इंजिनियरिंगचं काम केलेलं असलं पाहिजे.

90 दिवसाचं मूल ते 65 वर्षाच्या व्यक्तीसाठी आहे 'ही' LIC पाॅलिसी

या उमेदवारांना मिळेल प्राधान्य - उमेदवाराकडे civil/electrical/mechanical engineering  यात मास्टर डिगरी हवी. सोबत कन्स्ट्रक्शन, इक्विपमेंटची माहिती हवी. डिव्हिजनची जबाबदारी एकटं सांभाळू शकेल, असा उमेदवार हवा.

निवड प्रक्रिया - उमेदवाराची निवड पर्सनल इंटरव्ह्यूनं होईल.

रेल्वेची नवी सेवा, फिंगर प्रिंटवरून 'असं' बुक होईल ट्रेनचं तिकीट

पगार - उमेदवाराचा पगार 10 लाख ते 26 लाखाच्या मधे असेल. पगार 7व्या वेतनआयोगाप्रमाणे मिळेल.

असा करा अर्ज - fci.gov.in वर क्लिक करा. त्यानंतर लेटेस्ट न्यूज सेक्शनमध्ये 'Appointment to the Post of General Manager(Engineering) on Transfer Deputation/Permanent Absorption Basis in the Food Corporation of India' वर क्लिक करा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता - द एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ( Personnel ), फूड कॉरपोरेशन ऑफ इंडिया, हेडक्वाटर्स, 16-20, बाराखंभा लेन, नवी दिल्ली, 110001 इथे अर्ज पाठवावा.

थरारक 'ऑपरेशन महालक्ष्मी'चा संपूर्ण GROUND ZERO रिपोर्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: jobs
First Published: Jul 27, 2019 03:40 PM IST

ताज्या बातम्या