Home /News /career /

मंदीत संधी! IT कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया सुरू; 4 लाखांपासून 70 लाखांपर्यंत मिळणार पॅकेज

मंदीत संधी! IT कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया सुरू; 4 लाखांपासून 70 लाखांपर्यंत मिळणार पॅकेज

आयटी कंपन्यामध्ये नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कारण अनेक आयटी कंपन्यांमध्ये सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे.

    मुंबई, 24 नोव्हेंबर: कोरोनामुळे (Corona) गेले काही महिने संपूर्ण देशावर आर्थिक संकट आलं होतं. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. पण हळूहळू सगळं काही पूर्वपदावर येत आहे. आता आयटी कंपन्यांनी पुन्हा एकदा भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. स्टाफिंग फर्म एक्सफेनो (Xpheno) च्या रिपोर्टनुसार, आयटी कंपन्या आणि स्टार्टअप कंपन्यांमध्ये  ऑक्टोबर महिन्यात सर्वात जास्त लोकांची भरती झाली होती. आयटी क्षेत्राशी निगडीत असलेल्या सुमारे 1 लाख लोकांना ऑक्टोबरमध्ये रोजगार मिळाला. अशी माहिती हॉट टेक जॉब्स आणि हॉट स्किल्स Indian Unicorns & Soonicorns च्या रिपोर्टमधून समोर आली आहे. नवीन नोकऱ्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होते आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर, ऑक्टोबरमध्ये एक्सेंचर कंपनीत 3000 जागा होत्या. आता त्यामध्ये वाढ होऊन 7000 एवढी संख्या झाली आहे. नोकरीच्या जागा दिवसेंदिवस वाढत आहेत ही बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बाब आहे. IBM मध्ये ज्युनिअर लेव्हलच्या पोस्टसाठी 1725 जागा उपलब्ध आहेत. विप्रो कंपन्यांमध्ये 800 जागा उपलब्ध आहेत. कोणत्या पदांसाठी भरती सुरू आहेत ते जाणून घेऊया फुल स्टेक डेव्हलपर या पदासाठी प्रोग्रामिंगच्या भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच React.JS [Redux]आणि Angular.JS फ्रंट अँड तसेच बॅक एंड सारख्या Node.JS ची माहिती असणं आवश्यक आहे. ज्युनिअर लेव्हल आणि अनुभवी लोकांसाठीही या नोकऱ्या उपलब्ध आहेत. या पदांवर काम करणाऱ्या फ्रेशर्सना वर्षाला 4-6 लाखांपर्यंत पॅकेज मिळू शकतं तर अनुभवी व्यक्तींना 12 लाखांपर्यंत पैसे कमवण्याची संधी आहे. क्लाऊड कॉम्प्युटरिंग कोरोना काळामध्ये क्लाऊड कॉम्प्युरिंग मार्केटमध्ये मोठी वाढ झाली आहे. Amzon वेब सर्व्हिसेस, Azureआणि गूगल क्लाउड यासारख्या प्लॅटफार्म्सवर सध्या बंपर हायरिंग सुरू आहे. यामध्ये वर्षाला 4 ते 35 लाखांपर्यंत उत्पन्न मिळवण्याची संधी आहे. डेटा इंजिनिअर्स Hadoop सारख्या डेटा फ्रेमवर्कवर काम करण्यासाठी इंजिनिअर्सना पायथॉन आणि आरसारख्या प्रोग्रामिंग भाषांचं ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये काम करणाऱ्या फ्रेशरला वर्षभरात 4 -6 लाख कमवण्याची संधी आहे. तर 3  वर्षांपर्यंत अनुभव असणारी व्यक्ती वर्षाला 14 ते 15 लाखांच्या घरात पैसे कमवू शकते. तर अनुभवी इंजिनिअर्सना 70 लाखांपर्यंत पॅकेज मिळू शकतं. पदांबद्दलची अधिक माहिती संबंधित कंपन्यांच्या वेबसाईटवरुन मिळवता येईल.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Career

    पुढील बातम्या