पदवीधर तरुणांसाठी नोकरीची संधी, अर्ज करण्यासाठी 'ही' आहे शेवटची तारीख

पदवीधर तरुणांसाठी नोकरीची संधी, अर्ज करण्यासाठी 'ही' आहे शेवटची तारीख

अर्जासाठी इच्छुक उमेदवारांना पैसे द्यावे लागणार नाहीत. इच्छुक उमेदवारानं काय करायचं आहे वाचा सविस्तर

  • Share this:

मुंबई, 29 फेब्रुवारी : Electronics Corporation of India Limited Recruitment 2020: कंपनीने बेरोजगार आणि पदवीधर तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आणली आहे. कंपनी रिक्त जागा भरत असल्यानं इच्छुक उमेदवारांनी या कंपनीच्या वेबसाईटवरून अर्ज दाखल करावेत. टेक्निकल ऑफिसर या पदांसाठी ही भरती सुरू आहे. या कंपनीत कोणत्या पदांसाठी जागा आणि कसा अर्ज करायचा जाणून घ्या.

एकूण रिक्त जागा- 8

अर्ज भरण्याची तारीख- 25 फेब्रुवारी 2020 पासून सुरू

अर्ज भरण्याची अंतिम मुदत- 09 मार्च 2020

अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं वय 30 वर्षांपेक्षा जास्त असू नये.

हेही वाचा-भारतीय तरुणाने वयाच्या 24 व्या वर्षी उभी केली 71 हजार कोटींची कंपनी

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही युनिवर्सिटीतून उमेदवाराने इंजिनियरिंगची पदवी घेतलेली असावी. याशिवाय अर्जदार वेबसाईटला भेट देऊन माहिती पाहू शकतो.

कसा भरायचा अर्ज?

इछुक उमेदवारानं ईसीआईएल कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. www.ecil.co.in/ या वेबसाईटला भेट दिल्यानंतर आपण इथे रजिस्टर करायचं आहे. त्यानंतर पदांसाठी अर्ज दाखल करू शकता. अर्ज भरताना स्वत:ची माहिती नीट द्या. स्वत:चा फोटो आणि सही अपलोड करा.

या पदाचा अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराला कोणतेही अतिरिक्त शुल्क भरायचं नाही. उमेदवाराची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षेच्या आधारावर होणार आहे.

हेही वाचा-आता तुम्हाला मिळू शकते सरकारी नोकरी… ‘या’ 5 जागांसाठी आजच भरा अर्ज

हेही वाचा-SSC Board Exam : परीक्षेला जाताना शेवटच्या क्षणी करू नका या चुका

First published: February 29, 2020, 10:54 AM IST

ताज्या बातम्या