10 वी पास असणाऱ्या युवकांसाठी Sarkari Naukriची संधी, अर्ज करण्याची ही आहे शेवटची संधी

10 वी पास असणाऱ्या युवकांसाठी Sarkari Naukriची संधी, अर्ज करण्याची ही आहे शेवटची संधी

दहावी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारची संधी आहे. अजून आपण अर्ज केला नसेल तर आताच करा. नाहीतर ही संधी तुम्ही गमावू शकता.

  • Share this:

मुंबई, 07 फेब्रुवारी: सरकारी नोकरी कोणाला नको असते. युवकांमध्ये तर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आरक्षण आणि दिवसेंदिवस वाढत असलेल्या स्पर्धेत आपला नंबर लागावा यासाठी सगळेजण धडपडत असतात. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारची संधी आहे. अजून आपण अर्ज केला नसेल तर आताच करा. नाहीतर ही संधी तुम्ही गमावू शकता.

Railway Recruitment 2020: Sports कोट्यातून अनेक पदांसाठी रेल्वे भरती करत आहे. 10वी पास असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. अर्जदाराचं वय 18 वर्ष ते 25 वर्ष असणं आवश्यक आहे. indian railwayच्या वेबसाईटवर यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. 24 फेब्रुवारीपर्यंत उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. जनरल कोट्यातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 500 तर आरक्षित असणाऱ्यांना 250 रुपये फी शुल्क भरावं लागणार आहे.

Hindustan Copper Limited Recruitment 2020: हिंदुस्तान कॉपर लिमिटेड कंपनीने अप्रेंटिस अंतर्गत 161 पदांसाची भरती करत आहे. मेट (माइन्स),ब्लास्टर (माइन्स)फिटर, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, ड्राफ्ट्समॅन, ऑपरेटर आणि प्रोग्रॅमिंग असिस्टन्ट पदांचा यामध्ये समावेश असणार आहे. 10वी आणि ITI परीक्षेतील मार्कांवर विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार Hindustan Copper Limited कंपनीच्या संकेतस्थळाला भेट देऊन 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करू शकतात.

हेही वाचा-Board Exam 2020 : इंग्रजी विषयात चांगले गुण मिळवण्यासाठी वापरा 10 सोप्या टिप्स

Rajasthan High Court Stenographer: राजस्थान उच्च न्य़ायालयात स्टेनोग्राफर 434 जागा रिक्त आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी hcraj.nic.in यासंकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करावा. याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी आहे. जनरल उमेदवारांसाठी 650 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तर आरक्षित उमेदवारांसाठी 400 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

DSSSB Recruitment 2020: राजधानी दिल्लीमध्ये सरकारी नोकरी करण्याची संधी उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवार 27 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरू शकतात. www.dsssb.delhigovt.nic.in यासंकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज दाखल करू शकता.

हेही वाचा-Board Exam 2020: फिजिक्सच्या पेपरमध्ये उत्तम गुण मिळवण्यासाठी स्मार्ट टिप्स

First published: February 7, 2020, 1:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading