Home /News /career /

रिझर्व्ह बँकेच्या ग्रेड B अधिकारी पदासाठी अर्ज करताय, मग हे जरूर वाचा!

रिझर्व्ह बँकेच्या ग्रेड B अधिकारी पदासाठी अर्ज करताय, मग हे जरूर वाचा!

RBI Grade B अधिकारी पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगळी आहे. उमेदवारांचे किमान वय 21 वर्ष असणं आवश्यक आहे.

मुंबई, 29 जानेवारी : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserved Bank of India) आपल्या अधिकृत वेबसाइट rbi.gov.in वर विविध विभागांसाठी ग्रेड बी अधिकाऱ्यांच्या (RBI Grade B officer) भरतीची अधिसूचना जारी केली आहे. ज्या उमेदवारांना आरबीआयच्या ग्रेड बी अधिकारी पदासाठी अर्ज करायचा आहे ते आजपासून ऑनलाइन अर्ज भरू शकणार आहेत. 15 फेब्रुवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या पदासाठीची पहिल्या टप्प्यातील परीक्षा 6 मार्च रोजी, तर दुसऱ्या टप्प्याची परीक्षा एक एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. आरबीआयने ग्रेड बी अधिकारी पदासाठी (DR) - General, (DR) - DEPR आणि (DR) - DSIM अशा एकूण ३२२ रिक्त जागांच्या भरतीबाबत घोषणा केली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना या पदासाठीचे पात्रता निकष आणि इतर तपशिल जाणून घेणं आवश्यक आहे. त्याबाबत माहिती खालीलप्रमाणे... वयोमर्यादा - उमेदवारांचे किमान वय 21 वर्ष असणे आवश्यक आहे. तसंच उमेदवाराचे जास्तीत जास्त वय 30 वर्षे असणे आवश्यक आहे. M.Phil. आणि Ph.D. पदवी असलेल्या उमेदवारासाठी वयोमर्यादा 32 ते 34 वर्षांपर्यंत आहे. शैक्षणिक पात्रता - आरबीआय ग्रेड 'B' अधिकारी पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगळी आहे. Grade B (DR) : या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेत पदवीधर असणे आवश्यक आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून त्याला किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे. या महिलेनं 20 वर्ष करत असलेली नोकरी सोडत सुरू केला बिझनेस, आज आहे करोडपती Grade B (DR) DEPR : या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे इकॉनॉमिक्स (Economics)/ इकॉनॉमेट्रिक्स (Econometrics)/ क्वांटेटेटिव्ह इकॉनॉमिक्स (Quantitative Economics)/ मॅथेमॅटिक्स इकॉनॉमिक्स (Mathematical Economics)/ इंटेग्रेटेड इकॉनॉमिक्स कोर्स (Integrated Economics Course)/ फायनान्स (Finance) या विषयामध्ये 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी असावी. Grade B (DR) DSIM - या पदासाठी उमेदवाराकडे किमान 55 टक्के गुणांसह गणित विषयामध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष श्रेणीतील (equivalent grade) स्टॅटिस्टिकमध्ये (Statistics) एक वर्षे पदव्युत्तर पदविका असावी. फक्त चॉकलेट खा आणि लाखो रुपये कमवा; तुमच्यासाठी हटके जॉबची ऑफर या पदासाठी असा अर्ज करा : 1. आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या - rbi.gov.in 2. वेबसाईटचे होमपेज खाली स्क्रोल करा आणि ‘Opportunities@rbi’या लिंकवर क्लिक करा. 3. ‘current vacancies’ या टॅबवर जा आणि पुढे ‘vacancies’ हा पर्याय निवडा. 4. एक नवीन पेज येईल. आरबीआय ग्रेड बी अधिकारी भरती 2021 या लिंकवर क्लिक करा. 5. अधिकृत सूचना काळजीपूर्वक वाचा आणि ऑनलाइन अर्जाच्या लिंकवर क्लिक करा. 6. अर्जावरील सर्व माहिती पूर्ण भरा आणि आवश्यक कागदपत्रे (documents) अपलोड करा. 7. अर्जासाठीची फी भरा. 8. भविष्यातील संदर्भासाठी आरबीआय ग्रेड बी अधिकारी पदाच्या अर्जाची प्रत डाउनलोड करा.
First published:

Tags: Jobs, Rbi, Reserve bank of india

पुढील बातम्या