मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Job Alert : प्राध्यापक पदांसाठी भरती प्रक्रिया पुन्हा सुरू; असा करता येईल अर्ज

Job Alert : प्राध्यापक पदांसाठी भरती प्रक्रिया पुन्हा सुरू; असा करता येईल अर्ज

सध्या कोरोनामुळे (Corona) शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. थांबलेल्या नेमणुका आता पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहेत.

सध्या कोरोनामुळे (Corona) शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. थांबलेल्या नेमणुका आता पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहेत.

सध्या कोरोनामुळे (Corona) शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. थांबलेल्या नेमणुका आता पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहेत.

नवी दिल्ली, 3 जुलै: सध्या कोरोनामुळे (Corona) शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. एकीकडे ऑनलाइन शिक्षणाला प्राधान्य दिलं जात असताना, शिक्षण क्षेत्रात रोजगार संधी शोधणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा उमेदवारांसाठी नोकरीची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. उत्तर प्रदेश उच्च शिक्षण सेवा आयोगाने (UPHESC) विनाअनुदानित पदवी महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक (Assistant Professor) पदांवर भरतीसाठी पुन्हा एकदा प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांची सोय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी इच्छुक उमेदवार 8 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज भरला आहे. परंतु त्यात अनवधानाने काही चूक राहिली असेल, तर ती सुधारण्याची एक संधी या उमेदवारांना मिळणार आहे; मात्र यासाठी अशा उमेदवारांना अर्जाचं शुल्क पुन्हा भरावं लागणार आहे. यापूर्वी जमा केलेलं शुल्क ग्राह्य धरलं जाणार नाही. याबाबत माहिती देण्यासाठी संस्थेने नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार (Notification) सहायक प्राध्यापकांची 2003 पदं या प्रक्रियेच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. आयोगाच्या नोटिफिकेशनच्या आधारे, 'टीव्ही नाइन हिंदी'ने वृत्त दिलं आहे.

पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

सहायक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील मास्टर्स डिग्री अर्थात पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवार पदव्युत्तर पदवीमध्ये किमान 55 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेला असावा. NET/SET/SLET उत्तीर्ण झालेले उमेदवारदेखील या पदासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करतेवेळी उमेदवाराचं वय 21पेक्षा अधिक आणि 62 वर्षांपेक्षा कमी असावं. आरक्षण कक्षेतल्या उमेदवारास कमाल वयोमर्यादेबाबत सूट दिली जाणार नाही, असंही आयोगाने कळवलं आहे.

असा करा अर्ज

उत्तर प्रदेशातल्या विनाअनुदानित महाविद्यालयांमधल्या या पदांच्या भरतीकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम uphesconline.org या अधिकृत वेबसाइटवर जावं. होमपेजवरच्या Apply For Assistant Professor या पर्यायावर जावं. त्यानंतर संबंधित विषयाच्या लिंकवर जाऊन मागणी करण्यात आलेली माहिती भरून रजिस्ट्रेशन (Registration) करावं. रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवार अर्ज भरू शकतो.

पदांचा तपशील

या प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण 47 विविध विषयांसाठी सहायक प्राध्यापकांची 2003 पदं भरली जाणार आहेत. यात हिंदीसाठी 162, इंग्रजीसाठी 133, सोशिओलॉजीसाठी 102, भूगोलासाठी 142, पॉलिटिकल सायन्ससाठी 109, इकोनॉमिक्सकरिता 100, केमिस्ट्रीकरिता 159, BEd करिता 113, फिजिक्सकरिता 98, झूलॉजीसाठी 96, कॉमर्सकरिता 79, मॅथेमॅटिक्ससाठी 96, बॉटनीकरिता 92, संस्कृतसाठी 74, फिजिकल एज्युकेशनसाठी 23 आणि इतिहास या विषयासाठी 41 असी सहायक प्राध्यापकांची पदं भरली जाणार आहेत.

First published:

Tags: Career, Job alert, Uttar pradesh