मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Job alert: आज अर्ज करण्याची शेवटची तारीख; General Insurance मध्ये सुरू आहे भरती

Job alert: आज अर्ज करण्याची शेवटची तारीख; General Insurance मध्ये सुरू आहे भरती

सरकारी नोकरीच्या या मोठ्या संधीकडे दुर्लक्ष करू नका. General Insurance Corporation of India मध्ये नोकरीची संधी आहे आणि ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च आहे.

नवी दिल्ली, 29 मार्च : 'जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'नं असिस्टंट मॅनेजर या पदासाठी 44 जागांची भरती काढली आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.  (job alert)

आज ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या अर्जाच्या फॉर्मची फीस भरण्याची शेवटची तारीख आज 29 मार्च ही आहे. अर्जासाठीची फीस भरल्यानंतर उमेदवारानं सबमिट केलेला अर्ज 13 एप्रिलपर्यंत डाउनलोड करायचा आहे. यात फायनान्स /सीए विभागात 15, जनरल मध्ये 15, लीगल मध्ये 4 आणि इन्श्युरन्समध्ये 10 पदांवर भरती केली जाते आहे. या पदांपैकी एखाद्या पदावर निवड झाल्यास 65,000 रुपयांपर्यंत पगार मिळेल. (general insurance corporation of India vacancy)

हेही वाचा हा व्यवसाय करून अवघ्या 4 महिन्यात कमवा 8 लाख रुपये; सरकारही करेल मदत

या भरतीमध्ये निवडीसाठी लेखी परीक्षेनंतर ग्रुप डिस्कशन्स आणि नंतर मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी होईल. भरतीसाठी लेखी परीक्षा 9 मे रोजी असेल. याच्या दहा दिवस आधी परीक्षेचे हॉल तिकिट्स दिले जातील. (GIC recruitment 2021)

ही असेल वयोमर्यादा

21 ते 30 वर्ष

एससी एसटी कॅटेगरीला पाच वर्ष आणि ओबीसीसाठी कमाल वयोमर्यादेत 3 वर्षांची सूट मिळेल. (GIC calls for application)

हा असेल पगार

32,795 प्रती महिना स्केल - रुपये 32,795- 1610(14)- 55335- 1745(4)- 62315 आणि इतर भत्ते (44 vacancies at GIC)

हेही वाचा 31 मार्चपूर्वीच करा ही महत्त्वाची 10 कामं, 1 एप्रिलपासून लागू होणार नवे नियम

या तारखा लक्षात ठेवा

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 मार्च 2021

अप्लिकेशन फीस भरण्याची मुदत - 11 मार्च ते 29 मार्च

First published:

Tags: Employment, Government employees, Insurance, Job alert