• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • जिल्हा सेतू समिती यवतमाळमध्ये ‘सुरक्षा रक्षक’ पदाच्या 25 जागांसाठी भरती; इतका मिळेल पगार

जिल्हा सेतू समिती यवतमाळमध्ये ‘सुरक्षा रक्षक’ पदाच्या 25 जागांसाठी भरती; इतका मिळेल पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2021 असणार आहे.

 • Share this:
  यवतमाळ, 05 ऑगस्ट:  जिल्हा सेतू समिती यवतमाळमध्ये (Jilha Setu Samiti Yavatmal Recruitment 2021) ‘सुरक्षा रक्षक’ पदाच्या 25 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीचो अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षक या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदासाठी भरती सुरक्षा रक्षक (Security Guard)  - एकूण जागा 25 पात्रता  उमेदवार हे  मिलिट्रीमधून किंवा पॅरामिलिट्रीमधून सेवानिवृत्त असावेत. उमेदवारांकडे स्वतःची बंदूक असावी. अग्निशस्त्र वापरण्याचा परवाना असावा. यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात काम करण्याची तयारी असावी. वय 50 वर्षांपेक्षा कमी असावं. हे वाचा -इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे इथे भरती; असं करा अप्लाय इतका मिळणार पगार सुरक्षा रक्षक (Security Guard)  - 10,000/- रुपये प्रतिमहिना अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू विभाग, यवतमाळ. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी https://yavatmal.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.
  Published by:Atharva Mahankal
  First published: