मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

JEE Mains 2022: परीक्षा तोंडावर पण अजूनही प्रवेशपत्र नाही; कधी आणि कुठे जारी होईल Admit Card? बघा

JEE Mains 2022: परीक्षा तोंडावर पण अजूनही प्रवेशपत्र नाही; कधी आणि कुठे जारी होईल Admit Card? बघा

JEE Mains परीक्षेसाठी हॉल तिकिट्स

JEE Mains परीक्षेसाठी हॉल तिकिट्स

प्रवेशपत्र आऊट झाल्यावर उमेदवार ते अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वरून डाउनलोड करू शकणार आहेत.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 19 जून: 23 जून ते 29 जून या कालावधीत संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Mains 2022 Ecam) मुख्य आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. परीक्षेच्या आधी अनेक विद्यार्थी त्यांची प्रवेशपत्रे जाहीर होण्याची वाट पाहत आहेत. आधीच्या अहवालानुसार, NTA 11 जून रोजी प्रवेशपत्र जारी करणार होते. मात्र अज्ञात कारणांमुळे, प्रवेशपत्रे जारी करण्यात आली नाहीत. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रवेशपत्र आऊट झाल्यावर उमेदवार ते अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वरून डाउनलोड करू शकणार आहेत.

JEE Mains 2022 साठी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी JEE Main 2022 प्रवेशपत्राची अचूक तारीख आणि वेळ जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइट nta.ac.in वेबसाइट तपासत राहणे आवश्यक आहे. सर्व अपडेट्स वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

10वी पास उमेदवारांना टपाल विभागात लगेच मिळेल जॉब; कोणतीच परीक्षा नाही; थेट नोकरी

संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE मुख्य परीक्षा 2022) दोन टप्प्यांत घेतली जाईल, जी जून आणि जुलैमध्ये घेतली जाणार आहे. JEE मेन 2022 फेज 1 ची परीक्षा 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28 आणि 29 जून 2022 रोजी होणार आहे. NITs (IITs), IITs आणि इतर केंद्रीय अनुदानित तांत्रिक संस्था (CFTIs) मध्ये BE/BTech अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी JEE Mains परीक्षा घेतली जाते.

NTA ने अधिकृतपणे प्रवेशपत्र जारी केल्यानंतर JEE Main 2022 प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना खालील स्टेप्स वापराव्या लागतील.

सुरुवातीला नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्या.

होमपेजवर, 'JEE Main Admit Card 2022' या लिंकवर क्लिक करा.

अर्ज क्रमांक आणि पासवर्ड यांसारखी आवश्यक क्रेडेन्शियल्स टाकून तुमच्या खात्यात लॉग इन करा.

वेबसाइटवरून हॉल तिकीट डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Entrance Exams, Exam Fever 2022, Jobs Exams