मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

JEE Mains Exam: महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; नंतर होणार परीक्षा

JEE Mains Exam: महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; नंतर होणार परीक्षा

सध्या महाराष्ट्र्रातील काही जिल्ह्यांमध्ये महापूर आला आहे. त्यामुळे या भागातील मुलांसाठी NTAनं मोठं पाऊल उचललं आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नवी दिल्ली, 24 जुलै: JEE Mains ही परीक्षा (JEE Mains exams) या वर्षी कोरोनामुळे (Corona) चार टप्प्यांमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार परीक्षेचा तिसरा टप्पा (JEE main Third session) हा 20 ते 25 जुलै दरम्यान घेण्यात येणार आहे. संपूर्ण देशभरातील विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्रही देण्यात आले आहेत. मात्र सध्या महाराष्ट्र्रातील काही जिल्ह्यांमध्ये महापूर आला आहे. त्यामुळे या भागातील मुलांसाठी NTAनं (National Testing Agency) मोठं पाऊल उचललं आहे.

JEE Mains परीक्षेच्या तिसऱ्या टप्यातील (JEE main Third session Exams) परीक्षा 20, 22, 25 आणि  27 जुलै या दिवशी घेण्यात येणार आहेत. मात्र सध्या महाराष्ट्रात महापुरानं (Flood in Maharashtra)अक्षरशः थैमान घातलं आहे. राज्यातील कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चिपळूण, पालघर, सांगली, सातारा आणि रायगड या भागात सध्या दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस झाल्यामुळे अनेक महामार्ग बंद झाले आहेत.

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचण्यास अडचणी येऊ शकतात ही बाब लक्षात घेऊन ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचणं शक्य होत नसेल अशा विद्यार्थ्यांना नंतरच्या तारखांना परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.

यासंदर्भात केंद्रीय उच्च शिक्षण विभागाकडून अपरिपत्रक काढण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना घाबरून जाण्याची गरज नाही. 25 आणि  27 जुलै रोजी होणारी परीक्षा आता अशा विद्यार्थ्यांसाठी नंतर होणार आहे. या परीक्षेच्या तारखा काही दिवसानंतर जाहीर करण्यात येणार आहेत. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी NTA च्या www.nta.ac.in आणि jeemain.nta.nic.in या दोन वेबसाईट्स सतत बघत राहण्याचं सांगण्यात आलंय.

First published:

Tags: Maharashtra, Rain flood