मुंबई, 25 मार्च: IIT, NIT आणि देशातील इतर नामांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE परीक्षा देणे आवश्यक आहे. जेईई परीक्षा दोन स्तरांवर घेतली जाते – जेईई मुख्य परीक्षा आणि जेईई Advance परीक्षा. JEE मेन्स सत्र 2 ची परीक्षा एप्रिल 2023 मध्ये होणार आहे. पण या परीक्षेसाठी हॉल तिकिट्स नक्की कधी येणार आहेत? हे जाणून घेऊया.
JEE परीक्षा NTA द्वारे आयोजित केली जाते. जेईई मुख्य सत्र 2 परीक्षेत बसलेले उमेदवार प्रवेशपत्र जारी होण्याची वाट पाहत आहेत. NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी लवकरच JEE मुख्य सत्र 2 परीक्षेचे प्रवेशपत्र jeemain.nta.nic.in (12वी नंतरच्या प्रवेश परीक्षा) अधिकृत वेबसाइटवर अपलोड करेल.
मोठी खूशखबर! ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मुंबई महापालिकेत बंपर भरतीची घोषणा; इतका मिळणार दिवसाचा पगार
जेईई मुख्य सत्र २ परीक्षा कधी होणार?
जेईई मुख्य सत्र 1 परीक्षा जानेवारी 2023 मध्ये (जेईई मुख्य परीक्षा 2023) घेण्यात आली. सत्र 2 ची परीक्षा 06, 08, 10, 11 आणि 12 एप्रिल रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. या तारखांव्यतिरिक्त 13 एप्रिल आणि 15 एप्रिल 2023 या तारखाही राखीव ठेवण्यात आल्या आहेत. जेईई मुख्य सत्र २ परीक्षेत बसण्यासाठी उमेदवारांकडे प्रवेशपत्र असणे अनिवार्य आहे.
Career Tips: घर, बंगला, TA, DA सगळंच! IRS ऑफिसर्सना मिळतात भन्नाट सुविधा; ही पात्रता आवश्यक
असं डाउनलोड करा हॉल तिकीट
JEE मुख्य सत्र 2 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केल्यानंतर, उमेदवार खाली नमूद केलेल्या चरणांचे अनुसरण करून ते डाउनलोड करू शकतात.
जेईई मेन jeemain.nta.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
होम पेजवर दिसणार्या JEE Mains Session 2 Admit Card 2023 लिंकवर क्लिक करा.
लॉगिन तपशील प्रविष्ट केल्यानंतर, सबमिट वर क्लिक करा.जेईई मुख्य सत्र 2 प्रवेशपत्र स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
प्रवेशपत्रावर नमूद केलेले सर्व तपशील पूर्णपणे तपासल्यानंतर ते डाउनलोड करा.
भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट काढा. प्रवेशपत्रात काही तफावत आढळल्यास, NTA ला कळवा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.