नागपूर, 14 सप्टेंबर : जेईई मेन्स परीक्षेत (JEE Mains 2021 Exam) झालेल्या अनियमिततेच्या संदर्भात नागपुरातील कोचिंग क्लासेसवर सीबीआयने धाड (CBI searches in Nagpur coaching classes) टाकली. सीबीआयच्या दिल्लीतील टीमने सोमवारी नागपुरातील सक्करदरा भागातील आरके जेईई कोचिंग सेंटवर सीबीआय कारवाई केली. दिल्लीचे पथक आणि स्थानिक सीबीआयच्या पथकाने की कारवाई केली असून महत्वाचे कागदपत्र जप्त केली आहेत.
अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई परीक्षेत गैरप्रकार झाल्याप्रकरणी दिल्लीत गुन्हा दाखल झाला आहे. याचे धागेदोरे नागपूरपर्यंत पोहचले असून नागपूरच्या कोचिंग क्लासवर सीबीआयने धडक कारवाई केली आहे.
यापूर्वी सीबीआयने दिल्ली, एनसीआर, इंदूर, पुणे, जमशेदपूर आणि बंगळुरूसह 19 ठिकाणांवर छापेमारी केली होती. तसेच या प्रकरणी काहींना बेड्याही ठोकल्या आहेत. असं म्हटलं जात आहे की, आरोपींच्या चौकशीत नागपूर कनेक्शन समोर आले आहे. त्यानंतर नागपुरात सीबीआयने धडक कारवाई केली आहे.
JEE Mains परीक्षेत अनियमिततेप्रकरणी CBIची पुण्यात छापेमारी
जेईई मेन्स परीक्षेचं चौथं सत्र 26, 27 आणि 31 ऑगस्ट रोजी तसेच 1 आणि 2 सप्टेंबर रोजी घेण्यात आलं होतं. मात्र, या परीक्षेत मोठी अनियमितता आढळून आली. या प्रकरणी सीबीआय चौकशी करत असून आतापर्यंत अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.
नागपुरातील कोचिंग क्लासेसच्या संचालकांचा यामध्ये हात असल्याचा सीबीआयला संशय आहे. या प्रकरणी सोमवारी छापेमारी झाल्यावर आता मंगळवारी सुद्धा देशभरातील विविध ठिकाणी सीबीआयकडून छापेमारी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.