Home /News /career /

धक-धक वाढली; अवघ्या काही दिवसांत जाहीर होणार JEE च्या पहिल्या सत्राचा निकाल; इथे करा चेक

धक-धक वाढली; अवघ्या काही दिवसांत जाहीर होणार JEE च्या पहिल्या सत्राचा निकाल; इथे करा चेक

JEE Mains Result 2022

JEE Mains Result 2022

जेईई मेन परीक्षेचे पहिले सत्र (जेईई मेन 2022) जून 2022 मध्ये घेण्यात आले होते. आता या सत्राचा निकाल लवकरच जाहीर होण्याची चिन्हं आहेत.

    मुंबई, 06 जुलै: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (JEE Main) 2022 सत्र 1 च्या तात्पुरत्या आन्सर की जारी केल्या आहेत. NTA ने JEE मेन 2022 सत्र-1 च्या आन्सर की सह उमेदवारांची उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका देखील जारी केल्या होत्या. गेल्या दोन वर्षांपासून जेईई परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बरेच बदल झाले आहेत. कोविड 19 मुळे, गेल्या वर्षी JEE परीक्षा 4 सत्रांमध्ये घेण्यात आली होती, तर यावर्षी ही परीक्षा 2 सत्रांमध्ये घेतली जात आहे. जेईई मेन परीक्षेचे पहिले सत्र (जेईई मेन 2022) जून 2022 मध्ये घेण्यात आले होते. आता या सत्राचा निकाल लवकरच जाहीर होण्याची चिन्हं आहेत. देशातील नामांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळवू इच्छिणारे विद्यार्थी जेईई परीक्षेला बसतात. JEE मुख्य सत्र 2 ची परीक्षा जुलैमध्ये होणार आहे. NTA त्यापूर्वी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर JEE मुख्य पहिल्या सत्र परीक्षेचा (JEE Mains Result 2022) निकाल अपलोड करेल अशी अपेक्षा आहे. CBSE Results: इंटरनेट नसेल, वेबसाईट क्रॅश झाली तरी नो प्रॉब्लेम; फक्त करा एक SMS दुसऱ्या क्षणी मिळेल निकाल 9 जुलैपर्यंत करू शकता अर्ज जेईई मेन 2022 सत्र 2 साठी नोंदणी विंडो लिंक पुन्हा उघडण्यात आली आहे. जेईईच्या जुलै परीक्षेत बसू इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. JEE मेन 2022 सत्र 2 नोंदणी लिंक 9 जुलै 2022 रोजी रात्री 11:50 पर्यंत उघडली जाईल. असे करू शकाल प्रवेशपत्र डाउनलोड सुरुवातीला नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्या. होमपेजवर, 'JEE Main Admit Card 2022' या लिंकवर क्लिक करा. अर्ज क्रमांक आणि पासवर्ड यांसारखी आवश्यक क्रेडेन्शियल्स टाकून तुमच्या खात्यात लॉग इन करा. वेबसाइटवरून हॉल तिकीट डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Entrance Exams, Exam result, Job, Job alert

    पुढील बातम्या