मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Kavya Chopra ने घडवला इतिहास! JEE Main 2021 मध्ये मिळवले 300 पैकी 300 गुण

Kavya Chopra ने घडवला इतिहास! JEE Main 2021 मध्ये मिळवले 300 पैकी 300 गुण

Kavya Chopra आयआयटी प्रवेश परीक्षा- JEE Advanced 2021 ची तयारी करत आहे.

Kavya Chopra आयआयटी प्रवेश परीक्षा- JEE Advanced 2021 ची तयारी करत आहे.

Kavya Chopra आयआयटी प्रवेश परीक्षा- JEE Advanced 2021 ची तयारी करत आहे.

दिल्ली, 25 मार्च: दिल्लीच्या काव्या चोप्राने (Kavya Chopra) इतिहास घडवला आहे. काव्याने Joint Entrance Examination (JEE) मुख्य 2021 मध्ये केवळ शंभर टक्के गुण मिळवले नाहीत तर अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत 300 पैकी 300 गुण मिळविणारी ती पहिली महिला विद्यार्थी ठरली आहे. चोप्राने फेब्रुवारी महिन्यात दिलेल्या परीक्षेत 99.9 टक्के गुण मिळवले होते, त्यात सुधारणा करत आता तिला 100 टक्के गुण मिळाले आहेत.  ती आता आयआयटी प्रवेश परीक्षा- JEE Advanced 2021 ची तयारी करत आहे.

रंजक बाब म्हणजे काव्या तिच्या 99.9 टक्के गुणांवर नाखूश होती. तिच्या 99.9 टक्के गुणांच्या आधारेही ती जेईई अ‍ॅडव्हान्स्डसाठी पात्र ठरली असती. पण ती यावर समाधानी नव्हती आणि तिला असा विश्वास होता की आणखी चांगली कामगिरी तिला करता येईल.

(हे वाचा-वडिल वारले, आईनं केली आत्महत्या, तो मात्र हिंमत न हारता पोलिस बनला)

कोटाच्या अ‍ॅलन कोचिंग संस्थेची ही विद्यार्थिनी आता आयआयटी-दिल्ली (IIT-Delhi) किंवा आयआयटी-बॉम्बेमधून (IIT Bombay) संगणक शास्त्राचा (computer science) अभ्यास करण्याचे लक्ष्य उराशी बाळगून आहे. news18.com ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, 'मला गणिताची आवड आहे आणि संगणक विज्ञान हे गणिताचे अॅप्लिकेशन आहे आणि यामध्ये आर्थिकदृष्ट्या स्थिर करिअर देखील आहे.'

काव्याने तिच्या यशानंतर अशी प्रतिक्रिया दिली आहे की, तिला नेहमीच बरोबरीच्या संधी मिळाल्या पण भारतातील मुलींना कोणत्या समस्येला सामोरे जावे लागते याची तिला कल्पना आहे. काव्याने अशी प्रतिक्रिया दिली की, 'मला आणि माझ्या भावाला माझ्या पालकांनी बरोबरीची वागणूक दिली. माझ्या लिंगानुसार वैयक्तिकरित्या माझ्याशी कधीही भेदभाव केला नाही पण मला ठाऊक आहे की भारतातील बर्‍याच मुलींना इतका विशेषाधिकार दिला जात नाही. जरी माझ्याशी कधीही भेदभाव केला गेला नाही, तरीही इतर मुली कोणत्या परिस्थितीतून जातात हे मला माहिती आहे.' 17 वर्षीय काव्याला अशी अपेक्षा आहे की तिच्या या यशामुळे इतर मुलींसाठी दरवाजे उघडले जातील.

(हे वाचा-CBSE: सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षापद्धत आणि अभ्यास बदलणार)

काव्या तिच्या वडिलांना आदर्श मानते. काव्याचे वडीलही दिल्लीत इंजिनिअर आहेत. काव्याने अशी माहिती दिली मार्चमध्ये पुन्हा एकदा परीक्षा देण्यासाठी तिने दरदिवशी 7-8 तास अभ्यास केला, विशेषत: तिने रसायनशास्त्र या सेक्शनवर लक्ष्य केंद्रित केलं होतं.

First published:

Tags: Exam result, IIT