Home /News /career /

JEE Main 2021: परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या शेड्युल

JEE Main 2021: परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या शेड्युल

फेब्रुवारी महिन्या 23,24,25, 26 तारखांना परीक्षा होणार आहेत. त्या प्रकारे मार्च महिन्यात 15, 16, 17, 18 तारखांना परीक्षा होणार आहे.

    नवी दिल्ली, 17 डिसेंबर : कोरोनामुळे परीक्षांचं आणि अभ्यासाचं सगळंच गणित बदललं आहे. त्यामुळे यंदा JEE परीक्षा 4 वेळा होणार आहे. JEE मेन परीक्षेचा संभ्रम संपला असून आता तारखा जाहीर करण्यात आला आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी नियमित ऑनलाइन पत्रकार परिषदेत परीक्षेच्या तारखांची घोषणा केली. जेईई मेन परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी 16 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. यासंदर्भात NTA ने JEE Main परीक्षा 2021 ची अधिकृत अधिसूचना jeemain.nta.nic.in वेबसाइटवर देखील जारी केली आहे. कधी होणार परीक्षा xamतर एप्रिल महिन्यात 27, 28, 29 आणि 30 तर मे महिन्यात 24, 25, 26, 27, 28 तारखांना परीक्षा होणार आहे. NIT आणि ट्रिपल IIIT इत्यादींसह इतर तंत्रज्ञान संस्था बी.टेक, बी.ई. प्रवेशासाठी घेतली जाते. जेईई मेनमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांनाच जेईई प्रगत परीक्षेत संधी मिळते. जेईई प्रगत परीक्षेतून देशातील 23 प्रतिष्ठित आयआयटीमध्ये प्रवेश दिला जातो. हे वाचा-भारतीय रेल्वेमध्ये मेगाभरती; 15 डिसेंबरपासून तीन टप्प्यात होणार ऑनलाइन परीक्षा JEE मेन परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nic.in वर भेट द्यावी. येथे देण्यात आलेल्या 'JEE मेन एप्रिल 2021 साठी अर्ज करा' वर क्लिक करा. त्यानंतर लॉगइन करावं आणि नोंदवी करावी. पुढे अर्ज करण्यासाठी फ्रेश यूजरवर क्लिक करा. फॉर्ममध्ये विचारलेल्या सर्व आवश्यक माहिती भरा. यावेळी फोटो स्कॅन करुन अपलोड करावा लागेल. अर्ज फी देखील भरावी लागेल. यानंतर नोंदणी क्रमांक सुरक्षित ठेवा.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या