मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

JEE Advanced Exam: परीक्षेसाठी Admit Cards अजूनही डाउनलोड केले नाहीत? ही घ्या डायरेक्ट लिंक

JEE Advanced Exam: परीक्षेसाठी Admit Cards अजूनही डाउनलोड केले नाहीत? ही घ्या डायरेक्ट लिंक

उद्याच जाहीर होणार JEE Advanced Result

उद्याच जाहीर होणार JEE Advanced Result

JEE Advanced Exam: या परीक्षेचं हॉल तिकिट्स आता जारी करण्यात आले आहेत. हे Admit Cards नक्की कसे डाउनलोड करावे हे जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 ऑगस्ट: बारावीनंतर कोणत्याही टेक्निकल आणि इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये प्रवेश (How to get admission in Engineering) मिळवण्यासाठी JEE Mains आणि JEE Advanced परीक्षेचे मार्क्स महत्त्वाचे असतात. म्हणूनच अनेक विद्यार्थी यासाठी प्रचंड मेहनत करत असतात. आपल्यालाच चांगलं कॉलेज मिळावं यासाठी प्रत्येक विषयाचा जीवतोड अभ्यास करत असतात. यंदा ही परीक्षा लवकरच होणार आहे. त्यामुळे या परीक्षेचं हॉल तिकिट्स आता जारी करण्यात आले आहेत. हे Admit Cards नक्की कसे डाउनलोड करावे हे जाणून घेऊया.

JEE Advanced 2022 ची परीक्षा 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. पेपर 1 सकाळी 9 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत आणि पेपर 2 दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत घेण्यात येईल.

ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; BEL मुंबईत 'या' पदांसाठी भरतीची घोषणा; लगेच करा अर्ज

अशा पद्धतीनं डाउनलोड करा हॉल तिकीट

jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

होमपेजवर, अॅडमिट कार्ड लिंकवर क्लिक करा.

तुमचे लॉगिन तपशील सबमिट करा.

स्क्रीनवर JEE Advanced Admit Card दिसेल.

डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.

परीक्षेत तीन तासांच्या कालावधीचे दोन पेपर (पेपर 1 आणि पेपर 2) असतात. दोन्ही पेपरमध्ये उपस्थित राहणे बंधनकारक आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मध्ये विविध कार्यक्रमांच्या प्रवेशासाठी JEE Advanced परीक्षा घेतली जाते. उमेदवार जेईई (प्रगत) सलग दोन वर्षांत जास्तीत जास्त दोनदा येऊ शकतो. परीक्षा केवळ संगणक आधारित चाचणी (CBT) मोडमध्ये घेतली जाईल.

JEE Advanced Exam 2022 साठी Admit Cards डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

JEE Advanced Exam 2023 मध्ये हे होतील बदल

JEE Advanced 2023 परीक्षेत अनेक बदल करण्यात आले आहेत. JEE Advanced Syllabus मधून काही गोष्टी काढून टाकण्यात आल्या आहेत आणि काही नवीन विषय देखील जोडण्यात आले आहेत. JEE Advanced Exam 2023 च्या अभ्यासक्रमातील बहुतांश बदल भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयांमध्ये करण्यात आले आहेत. jeeadv.ac.in या वेबसाईटवर उमेदवार अपडेटेड सिलॅबस बघू शकणार आहेत.

First published:

Tags: Career opportunities, Entrance Exams, Exam, Jobs Exams