मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

JEE Advanced 2021: उमेदवारांनो, JEE Advanced परीक्षेची प्रोव्हिजनल आंसर की जारी; या लिंकवर लगेच करा चेक

JEE Advanced 2021: उमेदवारांनो, JEE Advanced परीक्षेची प्रोव्हिजनल आंसर की जारी; या लिंकवर लगेच करा चेक

आता आंसर की जारी करण्यात आली आहे.

आता आंसर की जारी करण्यात आली आहे.

आता आंसर की जारी करण्यात आली आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर:  JEE Advanced 2021 परीक्षेची तात्पुरती उत्तर की (JEE Advanced Answer Key 2021) जारी करण्यात आली आहे. उत्तरपत्रिका jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध (JEE Advanced 2021 official Websites) करण्यात आली. जारी केलेल्या या प्रोव्हिजनल आंसर कीवर उमेदवार 11 ऑक्टोबर 2021 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हरकती नोंदवू शकणार आहेत.

IIT खरगपूरनं ही परीक्षा आयोजित केली होती. JEE Mains ची परीक्षा अनेक टप्प्यांमध्ये घेतल्यानंतर JEE Advanced 2021 ही परीक्षा काही दिवसांआधी घेण्यात आली होती. त्यानुसार आता आंसर की जारी करण्यात आली आहे.

हे वाचा - Capgemini Pooled Campus Drive: Capgemini मध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीची मोठी संधी

प्रोव्हिजनल आंसर की वर प्राप्त हरकतींचा निपटारा केल्यानंतर अंतिम आंसर की जारी केली जाईल. पेपर 1 आणि पेपर 2 साठी आंसर की जारी केली जाईल. मीडिया रिपोर्टनुसार, अंतिम आंसर की 15 ऑक्टोबर 2021 रोजी जारी केली जाऊ शकते. 3 ऑक्टोबर 2021 रोजी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीद्वारे ही परीक्षा घेण्यात आली. सुमारे अडीच लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती.

अशा पद्धतीनं करा डाउनलोड

सुरूवातील JEE च्या अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in ओपन करा.

मुखपृष्ठावर दिलेल्या JEE Advanced Answer Key 2021 साठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

विनंती केलेली माहिती इथे टाका आणि सबमिट करा.

तुमच्या स्क्रीनवर आंसर की दिसेल.

ते आता डाउनलोड करा.

या लिंकवर करा क्लिक करा.

First published: