मोठी बातमी! JEE Advanced परीक्षेचा निकाल जाहीर, पुण्याचा चिराग पहिला

मोठी बातमी! JEE Advanced परीक्षेचा निकाल जाहीर, पुण्याचा चिराग पहिला

जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल JEE Advanced 2020 Results जाहीर झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर : जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल JEE Advanced 2020 Results जाहीर झाला आहे. या परीक्षेसाठी एकूण 1,50,838 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यापैकी 43,204 विद्यार्थी क्वालिफाय झाले आहेत. चिराग फलोर या आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्याने 396 पैकी 352 गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर रुडकी झोनमधून कनिषा मित्तल या आयआयटी रुडकीच्या विद्यार्थीनीने 396 पैकी 315 मार्क मिळवत 17वा क्रमांक पटकावला आहे.

JEE Advanced 2020 Result पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी http://result.jeeadv.ac.in/ या वेबसाईटवर लॉग इन करा. त्यानंतर परीक्षेचा Advanced Roll Number, जन्म तारीख आणि फोन नंबर लिहून सबमिट करा. त्यानंतर नवीन पेज ओपन होऊन त्यावर विद्यार्थी आपला रिझल्ट पाहू शकतात.

ज्या विद्यार्थ्यांनी JEE Advanced 2020 परीक्षा दिली आहे, ते आपला रिझल्ट ऑनलाईन jeeadv.ac.in वर पाहू शकणार आहेत. यावर्षी JEE Advanced 2020 exam साठी एकूण 1.6 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यापैकी 96 टक्के विद्यार्थ्यांनी 27 सप्टेंबर रोजी देशभरातील वेग-वेगळ्या सेंटर्सवर परीक्षा दिली होती.

हे वाचा-JEE Advanced Result 2020: असा चेक करा जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल

असा चेक करा JEE Advanced results 2020:

- jeeadv.ac.in या वेबसाईटवर जा

- होम पेजवर देण्यात आलेल्या JEE Advanced result 2020 link वर क्लिक करा

- स्क्रिनवर एक नवीन पेज ओपन होईल

- त्यानंतर सांगितलेले डिटेल्स भरुन लॉग इन करा

- JEE Advanced result स्क्रिनवर दिसेल

- रिझल्ट डाऊनलोड करुन सेव्ह करा आणि त्याची प्रिंटआऊटही काढा.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 5, 2020, 11:28 AM IST
Tags:

ताज्या बातम्या