मराठी बातम्या /बातम्या /करिअर /भन्नाटच! Coffee Lovers साठी खूशखबर; इटलीच्या फ्लोरेन्स यूनिव्हर्सिटींनं सुरु केला 'कॉफी'वर 9 महिन्यांचा मास्टर डिग्री कोर्स

भन्नाटच! Coffee Lovers साठी खूशखबर; इटलीच्या फ्लोरेन्स यूनिव्हर्सिटींनं सुरु केला 'कॉफी'वर 9 महिन्यांचा मास्टर डिग्री कोर्स

कॉफीवर तुम्हाला कोणी मास्टर कोर्स (Master Degree course on Coffee) आहे असं म्हंटलं तर तुमचा विश्वास बसेल? नक्कीच नाही. मात्र हे खरं आहे.

कॉफीवर तुम्हाला कोणी मास्टर कोर्स (Master Degree course on Coffee) आहे असं म्हंटलं तर तुमचा विश्वास बसेल? नक्कीच नाही. मात्र हे खरं आहे.

कॉफीवर तुम्हाला कोणी मास्टर कोर्स (Master Degree course on Coffee) आहे असं म्हंटलं तर तुमचा विश्वास बसेल? नक्कीच नाही. मात्र हे खरं आहे.

  मुंबई, 04 ऑक्टोबर: जगभरात कोणत्याही विषयांवर शिक्षण घेतलं तरी ते कधीही वाया जात नाही असं म्हणतात. अनेकजण शिक्षण घेताना किंवा अभ्यास करताना कॉफी (Coffee) पिणं पसंत करतात. कॉफीमुळे (Benefits of Coffee) संपूर्ण शरीरात उत्साह येतो असं म्हणतात. म्हणूच अनेक विद्यार्थ्याचं कॉफी हे पेय आवडतं असतं. पण याच कॉफीवर तुम्हाला कोणी मास्टर कोर्स (Master Degree course on Coffee) आहे असं म्हंटलं तर तुमचा विश्वास बसेल? नक्कीच नाही. मात्र हे खरं आहे.  इटलीच्या फ्लोरेन्स यूनिव्हर्सिटींनं (Italy's University of Florence) कॉफीवर तब्बल 9 महिन्यांचा मास्टर डिग्री कोर्स  सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

  इटलीतील फ्लोरेन्स विद्यापीठानं कॉफीमध्ये 9 महिन्यांची मास्टर डिग्री (9 months degree course on coffee) देण्याचा निर्णय घेतला आहे. मास्टर डिग्री कॉफीबद्दल थेरॉटिकल आणि बिझिनेससंबंधी ज्ञान प्रदान करणार आहे. अहवालांनुसार, अनेकांनी या अभ्यासक्रमासाठी आधीच प्रवेश घेतला आहे आणि 24 विद्यार्थ्यांची पहिली बॅच पुढील वर्षी जानेवारीमध्ये सुरू केली जाणार आहे.

  हे वाचा - End Of Work From Home: भारतातील या मोठ्या कंपन्या लवकरच बंद करणार वर्क फ्रॉम होम

  नऊ महिन्यांचा अभ्यासक्रमामध्ये थेरॉटिकल बाजूनं विद्यार्थी इतिहास, तंत्रज्ञान, रसायनशास्त्र आणि शीतपेयाचं अर्थशास्त्र शिकतील. व्यावहारिक फायद्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांसह इंडस्ट्रियल ट्रेनिंग देण्यात येणार आहे. तसंच विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी पाठवलं जाणार आहे.

  या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना कॉफीची उत्पत्ती कशी झाली इथपासून ते कॉफी ग्राहकांना सर्व्ह कशी करावी इथपर्यंत सर्व काही शिकवलं जाणार आहे", असं फ्लोरेन्स युनिव्हर्सिटीचे कृषी विभागाचे प्रमुख फ्रान्सिस्को गरबती पेगना यांनी म्हंटल आहे.

  या मास्टर डिग्री कोर्सची पहिली बॅच ही इटालियन भाषेतच राहणार आहे. मात्र जर या कोर्सला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर काही वर्षांनंतर हा कोर्स इंग्लिशमधेही सुरु करण्यात येणार आहे. इटलीमधील लोक प्रचंड प्रमाणात कॉफी पितात. विशेष म्हणजे काही रिपोर्ट्सनुसार एक इटालियन व्यक्ती हा तब्बल 6 किलो कॉफी एका वर्षात पितो. त्यामुळेच युनिव्हर्सिटीकडून हा कोर्स सुरु करण्यात आला आहे.

  हे वाचा - Part Time Jobs: काही तासांचं काम आणि मिळतील भरघोस पैसे; हे पार्ट टाइम जॉब्स कराच

  एकूणच काय तर कॉफीबद्दल शून्यापासून माहिती मिळवण्यासाठी हा कोर्स फायदेशीर असणार आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये कॉफीची वाढती मागणी बघता हा कोर्स सुरु करणं काळाची गरज बनली आहे. यामधून विद्यार्थ्यांना नवनवीन रोजगार मिळू शकणार आहेत. तसंच विद्यार्थ्यांना जगावेगळं नवीन काहीतरी शिकता येणार आहे.

  First published:
  top videos

   Tags: Career, Coffee