मराठी बातम्या /बातम्या /करिअर /IT Jobs: Coding Interview म्हंटलं की भल्याभल्यांच्या अंगावर येतो काटा; मुलाखतीआधी या टिप्स वाचाच

IT Jobs: Coding Interview म्हंटलं की भल्याभल्यांच्या अंगावर येतो काटा; मुलाखतीआधी या टिप्स वाचाच

मुलाखतीआधी या टिप्स वाचाच

मुलाखतीआधी या टिप्स वाचाच

आम्ही तुम्हाला कोडिंग इंटरव्ह्युवला जाण्यापूर्वी ज्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी त्या काही गोष्टी सांगणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 17 जानेवारी: नोकरी मिळवणं हे एक आव्हान आहे असं अनेकांना वाटत असतं. काही जण हसत-हसत नवी नोकरी मिळवतात तर काही जणं प्रचंड कष्ट करून ती मिळवतात. अनेक जण सगळं येत असूनही नोकरीच्या इंटरव्ह्युमध्ये कमी पडतात आणि हातची संधी गमावून बसतात. सध्या चलती असलेल्या इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जगात नोकरी शोधताना कोडिंग इंटरव्ह्युला अनन्यसाधारण महत्त्व असतं. अनेकांचा असा समज असतो की कोडिंगच्या प्रश्नांची उत्तरं दिली की नोकरी पक्की, ते खरंच्चे पण त्यासाठी योग्य तयारी आणि सराव करायला हवा. त्यामुळेच आम्ही तुम्हाला कोडिंग इंटरव्ह्युवला जाण्यापूर्वी ज्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी त्या काही गोष्टी सांगणार आहोत. कंटेंट टेकगिग डॉटकॉमने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

अमेरिकेतील पाच दिग्गज कंपन्यांना FAANG ऑर्गनायझेशन्स म्हणतात. अशा कंपन्यांच्या इंटरव्ह्युमधल्या प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम स्वरूपाचीच असते. त्यामुळे त्या पद्धतीचे म्हणजे कठीण प्रश्न सोडवण्याची तयारी तुम्हाला करायलाच हवी नाहीतर तुम्ही प्रश्न सोडवण्यासाठीच्या मूलभूत गोष्टी समजून घेण्याऐवजी जुनी उत्तरंच धुंडाळत बसाल. त्यामुळे प्रश्नच समजून न घेतल्याचा फटका बसून तुम्ही निराश होऊ शकाल. त्यामुळे तसे प्रश्न सोडवा.

LIC AAO Recruitment: अधिकारी पदाच्या तब्बल 300 जागांसाठी बंपर ओपनिंग्स; ही घ्या अर्जाची डायरेक्ट लिंक

बहुतांश उमेदवार उत्तरांची प्रक्रिया पाठ करून आलेले असतात. त्यामुळे इंटरव्ह्यु घेणाऱ्याच्या ते लगेच लक्षात येतं. तुम्ही उत्तरं किंवा ते सोडवण्याची पद्धत पाठ केली असेल तर तुम्ही ती वापरल्यामुळे प्रश्न सोडवण्याच्या संभाव्य शक्यतांकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि तुम्ही पाठ केलेल्या प्रश्नापेक्षा थोडा वेगळा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्ही तो सोडवू शकत नाही. त्यामुळे उकल करण्याची प्रक्रिया समजवून घ्या.

प्रश्नांची तयारी करताना तुम्हाला सोडवता येण्याजोगा प्रश्न विचारला दिसला तर तुम्ही लगेच घाईने त्याचं उत्तर येत असल्याच्या अविर्भावात ते तपासता पण अशावेळी त्याची इतर संभाव्य सोल्युशन्स काय असतील याचा विचार करण्याची सवय लावायला हवी. ही सवय तुमच्या मेंदूला वेगवेगळ्या पद्धतीने विचार करायची सवय लावते आणि तीच प्रश्न सोडवण्याची खरी योग्य पद्धत असते.

JOB ALERT: तुमच्याकडे डिग्री आहे? टायपिंगही येतं? मग संधी सोडूच नका; पुण्यात इथे होतेय भरती

तुम्ही इंटरव्ह्युमध्ये पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिल्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाता पण लक्षात राहू द्या की इंटरव्ह्युमध्ये तुम्हाला पहिल्या प्रश्नाची काठिण्य पातळी आणि त्याचं उत्तर सांगण्यासाठी तुम्हाला लागलेला वेळ याबद्दल प्रश्न विचारला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधल्यानंतर त्याची काठिण्य पातळी आणि तो सोडवण्यासाठी लागलेला वेळ हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं आणि हळूहळू कमी वेळात प्रश्न सोडवायची सवय करून घ्यायला हवी.

सामान्यपणे उमेदवार इंटरव्ह्युची तयारी करायला पुरेसा वेळ मिळाला नाही म्हणून नाराज होतात आणि इंटरव्ह्युवच्या शेवटी आपल्याला उत्तरं देता आली नाहीत म्हणूनही नाराज (disappointed at two stages) होतात. पण तसं करायची गरज नाही ही शिक्षणाची प्रक्रिया आहे त्यामुळे त्यात चुकणं बरोबर येणं हे शक्य आहे हे आपण आपल्या मनाला सांगायला हवं आणि निराश न होता पुढच्या तयारीला लागायला हवं.

कोडिंगचा इंटरव्ह्यु देताना उमेदवारांना तयारीला पुरेसा वेळ मिळाला नाही याबद्दल वाईट वाटत राहतं. वरचे पाच मुद्दे लक्षात ठेवलेत तर तुम्हाला इंटरव्ह्युमध्ये यश मिळवायला मदत होईल. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की इंटरव्ह्युव घेणारी व्यक्ती तुम्ही प्रश्न किंवा अडचण कशी सोडवता हे पाहत असतात. तुम्ही यशस्वी होता की अयशस्वी याच्यात त्यांना फारसा रस नसतो. तुम्ही योग्यप्रकारे विचार करताय हे इंटरव्ह्युव घेणाऱ्याला पटलं की तुमची नोकरी पक्की.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert