मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये अपयशी ठरतात, हा त्यांचा दोष नव्हे; वाचा काय सांगतात शिक्षणतज्ज्ञ

विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये अपयशी ठरतात, हा त्यांचा दोष नव्हे; वाचा काय सांगतात शिक्षणतज्ज्ञ

आपल्या देशात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना फार आदर आणि प्रतिष्ठा मिळते. त्यामुळे सध्या अगदी लहान वयापासूनच, पालक आपल्या मुलांना प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी जुंपतात.

आपल्या देशात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना फार आदर आणि प्रतिष्ठा मिळते. त्यामुळे सध्या अगदी लहान वयापासूनच, पालक आपल्या मुलांना प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी जुंपतात.

आपल्या देशात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना फार आदर आणि प्रतिष्ठा मिळते. त्यामुळे सध्या अगदी लहान वयापासूनच, पालक आपल्या मुलांना प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी जुंपतात.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 7 ऑक्टोबर-   आपल्या देशात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना फार आदर आणि प्रतिष्ठा मिळते. त्यामुळे सध्या अगदी लहान वयापासूनच, पालक आपल्या मुलांना प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी जुंपतात. ही परिस्थिती बघून एका ट्विटर युजरनं एक विलक्षण दृष्टिकोन मांडला आहे. एक शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योजक असलेल्या अक्षत श्रीवास्तव यांनी अलीकडेच एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता तपासण्याचे स्वत:चे मापदंड दिले आहेत. त्यांच्या मते, विद्यार्थी कशी कामगिरी करतात यावरून नव्हे तर ते ज्या परीक्षांना बसले आहेत त्या परीक्षांच्या सक्सेस रेटनुसार मूल्यमापन झालं पाहिजे.

श्रीवास्तव यांनी आपल्या ट्विटमध्ये काही लोकप्रिय स्पर्धा परीक्षांचा उल्लेख केला आहे, ज्यांच्या निकालाकडे लाखो विद्यार्थी डोळे लावून बसतात. त्या परीक्षांमध्ये यूपीएस्सी, कॅट आणि क्लॅट यांचा समावेश आहे. श्रीवास्तवर यांच्या ट्विटनुसार, या परीक्षांचा सक्सेस रेट अनुक्रमे 0.2 टक्के, 2 टक्के आणि 5 टक्के इतका आहे.

(हे वाचा:Job Interview देताना एका झटक्यात व्हाल सिलेक्ट; फक्त 'या' IMP गोष्टी ठेवा लक्षात )

या परीक्षांच्या सक्सेस रेटचा उल्लेख करताना त्यांनी लिहिलं, "या परीक्षांमध्ये नापास होणाऱ्या मुलांबद्दल बोलायचं झाल्यास, कदाचित त्यांच्या क्षमतेमध्ये कमतरता नसून ती परीक्षांच्या सक्सेस रेटमध्ये आहे. असं असेल तर जास्त कष्ट आणि जास्त अभ्यासही कामी येत नाही." त्यांनी पुढे असंही लिहिलंय, "या कृत्रिम शर्यतीचा कोणाला फायदा होतो, याचा अंदाज तुम्ही लावू शकता."

श्रीवास्तव यांच्या ट्विटवर नेटिझन्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्यांच्या तर्काचं समर्थन केलं आहे तर, काहींनी नाराजी व्यक्त केली. एका युजरने कमेंट केली आहे की, "सक्सेस रेटमुळे लोक आपलं ध्येय साध्य करण्याऐवजी परीक्षांनाच ध्येय मानू लागले आहेत."

दुसर्‍या एका युजरनं कमेंट केली आहे, "या दृष्टिकोनाशी मी पूर्णपणे सहमत आहे. त्यात NEET आणि JEE परीक्षांचाही समावेश करा. ज्या प्रत्येक इच्छुक विद्यार्थ्याला पडणारं वाईट स्वप्न आहेत."

काही युजर्सनी श्रीवास्तव यांच्या या विचारांशी अगदी स्पष्टपणे असहमती दाखवली आहे. "ही विद्यार्थ्यांची समस्या आहे असं कोणीही म्हणत नाही. हे प्रकरण कोणत्याही शर्यतीसारखं आहे. प्रत्येक व्यक्ती अडचण आहे म्हणून पराभूत होत नाही. या ट्विटमागे खूप उथळ विचार दिसतो आहे," अशी कमेंट एका युजरनं केली आहे. "म्हणूनच या परीक्षा क्रॅक करणं एक प्रकारचं मोठ यश मानलं जातं. 50 टक्के सक्सेस रेट असलेल्या परीक्षेचा उपयोगच नाही…," अशी कमेंट आणखी एका युजरने केली आहे.

(हे वाचा:राज्याच्या पोलीस विभागात भरतीचं स्वप्न बघताय? मग पात्रतेपासून पदांपर्यंत ही माहिती असणं आवश्यक )

कंपन्या आणि शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या मोड्युल्स आणि कोर्सेसची पॅकेज ऑफर करत आहेत याकडे एका युजरने लक्ष वेधत याबाबतच्या वेगळ्या पैलूकडे लक्ष वेधलंय. तर दुसऱ्यानी लिहिलंय, ‘कोचिंग सेंटर आणि त्याच्या सभोवताली विद्यार्थ्यांची रहायची सोयही केली जाते.’स्पर्धा परीक्षांच्या 'स्पर्धे'मध्ये विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या वाताहतीबद्दल अनेकदा विविध शिक्षणतज्ज्ञांनी आपली मतं मांडली आहेत. त्यावरून वादही उभे राहिले आहेत. अक्षत श्रीवास्तव यांच्या ट्विटमुळे त्यात आणखी भर पडली आहे.

First published:

Tags: Career, Career opportunities