तिरुअनंतपुरम, 30 जून : इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) च्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्रात (Liquid Propulsion Systems Centre) मध्ये ‘पदवीधर आणि टेक्निशियन्सच्या (Apprentice jobs) अप्रेंटिस’ (Graduate Apprentice jobs) पदांची भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पदवीधर अॅप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेन्टिसच्या तब्बल 160 पदांसाठी ही पदभरती असणार आहे.
या पोस्टसाठी पदभरती
पदवीधर अप्रेंटिस (Graduate Apprentice) - एकूण जागा 73
टेक्निशियन अप्रेंटिस (Technician Apprentice) - एकूण जागा 87
हे वाचा - सरकारी नोकरी: DFCCIL मध्ये तब्बल 1 हजारपेक्षा जास्त रिक्त जागांसाठी पदभरती
शैक्षणिक पात्रता
पदवीधर अप्रेंटिस - मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इंस्ट्रूमेंटेशन/केमिकल/कॉम्प्युटर सायन्स/सिव्हिल & लायब्ररी सायन्स यापैकी कुठल्याही क्षेत्रात पदवी आवश्यक. (2019, 2020 & 2021 Batch)
टेक्निशियन अप्रेंटिस - मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इंस्ट्रूमेंटेशन/सिव्हिल/कॉम्प्युटर सायन्स/ऑटोमोबाईल & केमिकल यापैकी कुठल्याही क्षेत्रात डिप्लोमा आवश्यक. (2019, 2020 & 2021 Batch)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 जुलै 2021 (30 जून 2021 पासून अर्ज करण्यास सुरुवात होईल)
सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Isro, Jobs