मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

ISRO Online Course: ISRO नं 'या' उमेदवारांसाठी आणला 5 दिवसांचा ऑनलाईन सर्टिफिकेशन कोर्स; असं करा अप्लाय

ISRO Online Course: ISRO नं 'या' उमेदवारांसाठी आणला 5 दिवसांचा ऑनलाईन सर्टिफिकेशन कोर्स; असं करा अप्लाय

पूर्णपणे ऑनलाईन असलेल्या या कोर्समध्ये (ISRO course for students) काही विशेष गोष्टी शिकवण्यात येणार आहेत.

पूर्णपणे ऑनलाईन असलेल्या या कोर्समध्ये (ISRO course for students) काही विशेष गोष्टी शिकवण्यात येणार आहेत.

पूर्णपणे ऑनलाईन असलेल्या या कोर्समध्ये (ISRO course for students) काही विशेष गोष्टी शिकवण्यात येणार आहेत.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 06 ऑक्टोबर: इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशननं (ISRO) काही उमेदवारांसाठी ऑनलाईन कोर्स (ISRO Online course) घेण्याचं ठरवलं आहे. यासाठी ISRO नं प्रोफेशन्सल आणि रिसर्च (ISRO Online course for professionals) क्षेत्राशी निगडित असलेल्या उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. हा कोर्स पाच दिवसांचा असणार आहे. पूर्णपणे ऑनलाईन असलेल्या या कोर्समध्ये (ISRO course for students) काही विशेष गोष्टी शिकवण्यात येणार आहेत. ‘Geospatial Inputs for Enabling Master Plan Formulation under AMRUT Sub-scheme’. यावर हा कोर्स असणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या कोर्सबद्दल काही डिटेल्स.

कोर्सबद्दल काही डिटेल्स

हा कोर्स 11 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2021 दरम्यान होणार आहे.

कोर्समध्ये पाच लेक्चर्स असतील. प्रत्येक लेक्चरचा कालावधी दीड तासांचं असणार आहे.

हा कोर्स जिओस्पेशियल मॉडेलिंग आणि शहरी आणि प्रादेशिक क्षेत्रांसाठी अनुप्रयोगांवर असेल.

हा अभ्यासक्रम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (IIRS), देहरादून, इस्रोच्या अंतराळ विभागाचं केंद्र आयोजित करणार आहे.

हा कोर्स शहरी आणि प्रादेशिक नियोजन, शहरी आणि प्रादेशिक नियोजन, भूगोल, पर्यावरण अभ्यास, स्थापत्य अभियांत्रिकी, आर्किटेक्चर या क्षेत्राशी निगडित उमेदवारांसाठी डिझाईन करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे हा कोर्स विनामूल्य असणार आहे.

ई-क्लास पोर्टलद्वारे कोर्सच्या 70 टक्के लेक्चर्समध्ये उपस्थित राहणाऱ्या सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

हे वाचा - Google Off Campus Drive: Google मध्ये 'या' बॅचेसच्या फ्रेशर्ससाठी नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

कोर्समध्ये काय असणार?

प्रोग्रामचा  overview, scope and coverage यामध्ये असणार आहे.

प्रकल्पाची अंमलबजावणी आणि वितरण

रिमोट सेन्सिंग डेटा सेटसह परिचिय.

शहरी वैशिष्ट्यांची ओळख आणि व्याख्या

Geographical Information System आणि मॉडेलिंग

Map projections आणि अप्लिकेशन

सर्व्हे टेक्निक्स आणि नेव्हिगेशन सिस्टम.

डिझाईन शहरी परिवर्तन (अमृत) शहरांसाठी अटल मिशनसाठी जीआयएस आधारित मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी डिझाइन आणि मानके अमृत मानकांवर आधारित नकाशे तयार करणे.

भारतातील भौगोलिक डेटा संकलन, वापर आणि डेटा शेअरिंग धोरण.

या कोर्ससाठी महत्त्वाच्या गोष्टी

डिव्हाईस - डेस्कटॉप/ कम्प्युटर किंवा लॅपटॉप

ऑपरेटिंग सिस्टम - Windows, Macintosh, Linux, Android or IoS

वेब ब्राउझर - Google Chrome, Firefox, Microsoft Edge or Safari

इंटरनेट स्पीड - 2 Mbps किंवा 3G पेक्षा जास्त स्पीड असणं आवश्यक.

कोर्ससाठी URL - https://www.eclass.iirs.gov.in/login.

हे वाचा - Siemens Recruitment: Siemens कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर्ससाठी मोठी सुवर्णसंधी

अशा पद्धतीनं करा अप्लाय

सुरुवातीला https://elearning.iirs.gov.in/edusatregistration/student या लिंकवर क्लिक करा.

उमेदवारांना त्यांची वैयक्तिक आणि शैक्षणिक पात्रता तपशील भरणे आवश्यक आहे.

फॉर्ममध्ये नमूद केलेला ईमेल पत्ता आणि फोन नंबर अचूक असल्याची खात्री करा.

फॉर्म सबमिट करण्यापूर्वी पूर्वावलोकन पर्यायावर क्लिक करा.

या कोर्ससाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.  

First published:

Tags: Career opportunities, Isro, जॉब