मुंबई, 24 जुलै: स्वप्न पाहाणं आणि ते जिद्दीनं पूर्णही करणं यामध्ये खूप अंतर असतं असं म्हटलं जातं. स्वप्न पाहून ती पूर्ण करण्याचं धाडस बाळगणाऱ्यांसाठी IPS इंद्रजित महथा यांची ही प्रेरणा देणारी संघर्षगाथा आहे.
शेतकरी कुटुंब आणि घरी अत्यंत गरीबी अशा परिस्थित शिकण्यासाठी पैसे तर कुठून आणायचे हा मोठा प्रश्न होता. ज्या शेतीवर पोट चालत होतं ती मुलाच्या शिक्षणासाठी वडिलांनी विकली आणि त्यातून मुलाचं शिक्षण केलं. आपल्या मुलाला शिक्षणात कोणतीही कसर पडू नये यासाठी त्यांनी स्वत:च्या जीवाचं रान केलं.
इंद्रजित यांनी वडिलांनी केलेल्या प्रत्येक कष्टाची आणि त्यांच्यासाठी गाळलेल्या घामाची जाणीव होती. घरची परिस्थिती हालाकीची झाल्यानं आई आणि बहिणींनी घर सोडून मामाचा आश्रय घेतला मात्र इंद्रजित यांनी हार मानली नाही. ते वडिलांजवळ राहिले.
इंद्रजित यांच्याजवळ नवीन पुस्तकं विकत घेण्यासाठी फारसे पैसे नव्हते. जुन्या आवृत्तीची पुस्तकं जी बहुतेक लोक कचर्यामध्ये विकतात. दिल्लीला आल्यावर येथे इंद्रजित यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. वडिलांनी त्यासाठी सुमारे 80 टक्के शेती विकली होती. इंद्रजितला समजले की अशा परिस्थितीत यशस्वी होण्याशिवाय पर्याय नाही. त्यावेळी रद्दतील पुस्तक विकत घेऊन किंवा मिळतील तशी वाचायला सुरुवात केली. ही पुस्तक वाचून त्यांनी आपला अभ्यास पूर्ण केला.
पहिल्या प्रयत्नात यश न मिळाल्यानं वडिलांना थोडा राग आला. दुसऱ्या प्रयत्नासाठी पुरेसे पैसे नव्हते अशावेळी त्यांनी आपली किडनी विकण्याची गोष्ट केली. वडिलांचे हे शब्द माझ्या काळजाला चर्रर्र करून गेले. त्यानंतर मात्र मी प्रचंड मेहनत घेऊन पुन्हा जोमानं अभ्यास केला आणि दुसऱ्या प्रयत्नात यश मिळालं असं IPS अधिकारी इंद्रजित यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.