नवी दिल्ली : मेहनतीत सातत्य ठेवलं तर या जगात काहीही अशक्य नाही. याचा प्रत्यय आयपीएस मनोज कुमार शर्मा यांची कथा ऐकूण येतो. एखाद्या चित्रपटाला शोभेल असाच त्यांचा आतापर्यंतचा जीवनपट आहे. आणि विशेष म्हणजे आता त्यांच्या आयुष्यावर लवकरच चित्रपट देखील येणार आहे. अनेक जण अपयश आल्यानंतर खचून जातात. प्रयत्न करणे सोडून देतात. मात्र मनोज कुमार शर्मा यांनी कधीही हार मानली नाही, जिद्द सोडली नाही, आणि आज याचाच रिझर्ट आपल्या समोर आहे. एकवेळ अशी होती की मनोज कुमार हे बारावी नापास झाले होते. मात्र बारावीची परीक्षा नापास होऊनही सर्वात कठीण समजली जाणारी आयपीएसची परीक्षा ते पास झाले. आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.
'प्रेमामुळेच ध्येय गाठता आलं'
मनोज कुमार शर्मा हे मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. आपणही आयपीएस, आयएएस अधिकारी बनावं असं त्यांना लहाणपणी वाटायचं. मात्र त्यांचं अभ्यासात फार लक्ष नव्हतं. परिणामी ते इयत्ता नववी आणि दहावीमध्ये कसेबसे उत्तीर्ण झाले. मात्र बारावीत ते नापास झाले. मनोज कुमार हे बारावीत फक्त हिंदी या एकाच विषयात पार झाले होते. मात्र तरी देखील त्यांनी जीद्द सोडली नाही. मी दोनदा प्रेमात पडलो. प्रेमामुळेच माझ्यावर नापास होण्याची वेळ आली. मात्र त्यानंतर प्रेमामुळे मी माझं ध्येय गाठू शकलो, मी आयपीएस परीक्षा पास झाल्याचं मनोज कुमार सांगतात. त्यांना लग्नासाठी त्यांच्या प्रेयसीने तशी अटच घातली होती. त्यांनी देखील खडतर मेहनत करून आयपीएस परीक्षेत यश मिळवलं.
हेही वाचा : अन्यथा पश्चातापाची वेळ येईल; विवाहापूर्वी प्रत्येक पुरुषाने आवर्जून या गोष्टी कराच!
पुस्तकांमधून प्रेरणा
बारावी नापास झाल्यानंतर त्यांना अत्यंत कठिण परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यांनी काही काळ ग्वालीयरमध्ये टेंम्पो देखील चालवला. त्यांना रात्री झोपण्यासाठी जागा देखील मिळत नसे. त्यामुळे भिकाऱ्यांसोबत झोपण्याची त्यांच्यावर वेळ आली. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील एका वाचनालयात चपराश्याचं काम सुरू केलं. या काळात त्यांचा पुस्तकांशी जवळून संबंध आला. त्यांचा इथेच मॅक्सिम गार्की, अब्राहन लिंकन यांच्या विचारांशी परिचय झाला. पुढे हेच विचार त्यांना जीवनाचं वास्तव समजून घेण्यासाठी उपयोगी ठरले.
हेही वाचा : दोरी उड्या की धावणं? वजन कमी करण्यासाठी कशाचा होतो फायदा
तरुणांसाठी प्रेरणादायी प्रवास
त्यानंतर त्यांनी मणाशी पक्की खूणगाठ मारली आणि झपाटल्यासारखे ते अभ्यासाला लागले. त्यांनी आयपीएस परीक्षेत यश मिळवलं. एक बारावी नापास मुलगा ते आयपीएस अधिकारी हा त्यांचा प्रवास नक्कीच तरुणांना प्रेरणा देणार आहे. आता लवकरच त्यांच्या आयुष्यावर एक चित्रपट येत आहे. चित्रपटाचं नाव ट्वेल्थ फेल असे असून, याचं दिग्दर्शक विधू विनोद चोपडा करत आहेत. या चित्रपटाचं चित्रिकरण दिल्लीतील मुखर्जी नगरात झालं आहे. इथेच मनोज कुमार यांनी परीक्षेची तयारी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.