मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Interview Tips: Job Interview एका झटक्यात Crack करायचाय? मग 'या' स्पेशल टिप्स नक्की करा फॉलो

Interview Tips: Job Interview एका झटक्यात Crack करायचाय? मग 'या' स्पेशल टिप्स नक्की करा फॉलो

पनीची जॉब ऑफर रिजेक्ट करता येईल

पनीची जॉब ऑफर रिजेक्ट करता येईल

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Personality development tips to crack job interview) देणार आहोत

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 18 नोव्हेंबर: आजकालच्या काळात जॉब मिळवण्यासाठी फक्त मार्क्स नाही तर तुमच्याजवळ टॅलेंट आणि ज्ञान असणंही आवश्यक आहे. म्हणूनच मुलाखतीदरम्यान (Interview Tips)मार्क्स सोबतच स्किल्स (Skills to crack job interview)असणंही आवश्यक आहे. मुलाखती दरम्यान तुमचा वागणं (Ideal behvaior during job interview) बोलणं उत्तम असेल तर तुम्हाला जॉब मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. मात्र काही लोक मुलाखती दरम्यान खूप घाबरतात. त्यांचा बायोडाटा (How to write resume)आणि लेखी परीक्षेचा निकाल खूप चांगला असतो पण तरीही ते मुलाखतीत नापास होतात (Success tips for job Interview). मात्र आता चिंता करू नका आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Personality development tips to crack job interview) देणार आहोत ज्यामुळे मुलाखतीदरम्यान तुमचा आत्मविश्वास तर वाढेलच आणि तुमाला जॉबही मिळेल.

खरं म्हणजे मुलाखतीला घाबरणाऱ्या उमेदवारांचा आत्मविश्वास कमकुवत होऊ लागतो, जो मुलाखत घेणाऱ्याला कळतो. जर तुम्ही मुलाखतीत यशस्वी होऊ शकत नसाल तर तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्व विकासाच्या टिप्सवर काम करणे आवश्यक आहे. कोणत्याही मुलाखतीत उमेदवाराच्या पात्रतेबरोबरच त्याच्या व्यक्तिमत्त्वाचीही कसून चाचणी घेतली जाते. अशा स्थितीत तुमचे संवाद कौशल्य, निर्णय कौशल्य, आत्मविश्वास इत्यादी खूप उपयोगी पडतात. पण मुलाखतकाराच्या मते, तुम्ही कुठेही कमी राहात असाल तर तुमची निवड होऊ शकणार नाही. चला तर मग जाणून घेऊया अशा काही टिप्स.

पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे नक्की काय?

व्यक्तिमत्व विकास (Personality Development) टिप्स म्हणजे तुमचे व्यक्तिमत्व वाढवणे. यामध्ये वैयक्तिक वागणूक, दृष्टीकोन, लोकांशी बोलण्याची पद्धत (Communication Skills in Job Interview) आणि स्वत:ला सादर करण्याची पद्धत यासह अनेक गोष्टी बदलाव्या लागतील. यामुळे, आत्मविश्वास एका वेगळ्या पातळीवर पोहोचतो आणि मग ती व्यक्ती कोणत्याही मुलाखतीपासून किंवा लोकांना भेटण्यास कमी पडत नाही. खाली नमूद केलेल्या या टिप्स तुम्हाला खूप मदत करतील.

तुमच्या स्वप्नातील Job! अवघे 14 दिवस करा काम आणि मिळवा तब्बल 9 लाख रुपये पगार

Day Plan महत्त्वाचा

टाईम मॅनेज करायला शिका आणि रोजची योजना बनवा. तुमच्या दिवसाची सुरुवात बरोबर करा. रोज सकाळी एखादे प्रेरणादायी पुस्तक किंवा कोट्स वाचा. तुमचे मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेवा आणि त्यानुसार तुमच्या दिवसाचे नियोजन करा.

फिटनेस आहे आवश्यक

तुमचे व्यक्तिमत्व चांगले करण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे फार महत्वाचे आहे. तुम्ही तंदुरुस्त राहिल्यास तुमची सकारात्मकता तुम्हाला प्रेरित करेल, जी पर्सनॅलिटी चांगली करण्यास मदत करेल.

करिअर क्षेत्रात निर्माण करा ओळख

तुम्ही करिअर करू इच्छित असलेल्या क्षेत्रात तुमचा ठसा उमटवण्यावर लक्ष केंद्रित करा. यामुळे लोकांच्या मनात तुमच्याबद्दल सकारात्मक विचार निर्माण होतो आणि त्यांना तुमच्यासोबत काम करायला आवडेल.

तरुण प्रोफेशनल्सना Job Ready बनवण्यासाठी TCS चा Free Online Course

बॉडी लँग्वेज महत्त्वाची

बॉडी लँग्वेज (Body Language in interview) हे व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे लोकांना तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते. तुमची उभं राहण्याची आणि बसण्याची स्थिती सरळ असल्याची खात्री करा. बोलत असताना समोरच्या व्यक्तीशी Eye कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब