मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Interview Tips: मुलाखतीदरम्यान 'या' महत्त्वाच्या गोष्टींकडे नक्की द्या लक्ष; तुम्हालाच मिळेल Job; वाचा सविस्तर

Interview Tips: मुलाखतीदरम्यान 'या' महत्त्वाच्या गोष्टींकडे नक्की द्या लक्ष; तुम्हालाच मिळेल Job; वाचा सविस्तर

चला तर जाणून घेऊया काही मुलाखतीच्या टिप्स.

चला तर जाणून घेऊया काही मुलाखतीच्या टिप्स.

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Interview Tips) देणार आहोत, ज्याद्वारे तुमची मुलाखतीत निवड (Interview cracking Tips) होईल

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 22 डिसेंबर: करिअरमध्ये (Career Tips) सातत्यपूर्ण प्रगती साधण्यासाठी काळाबरोबर पुढे जात राहणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या प्रोफेशनमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक पाहिले असतील, जे खूप मेहनती असूनही त्यांच्या करिअरमध्ये प्रगती (How to be successful in career) करू शकत नाहीत. एवढंच नाही तर नोकरीची मुलाखत क्रॅक (How to crack Interview) करणं देखील त्यांच्यासाठी खूप कठीण आहे. मात्र आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Interview Tips) देणार आहोत, ज्याद्वारे तुमची मुलाखतीत निवड (Interview cracking Tips) होईल आणि तुमच्या आवडत्या क्षेत्रात नोकरी मिळवता येईल. चला तर जाणून घेऊया काही मुलाखतीच्या टिप्स. चांगली शैक्षणिक पात्रता असूनही तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती करू शकत नसाल, तर तुम्ही स्वतःचा आढावा घ्यावा (career Growth). वास्तविक, कधी-कधी आपल्या वागण्यात अशा काही उणिवा असतात, ज्या मुलाखतकाराच्या समोर दिसून येतात. जेव्हा तुम्ही नोकरीच्या मुलाखतीसाठी जाल तेव्हा खाली दिलेल्या टिप्स पहा. तुम्हाला नक्कीच नोकरी मिळेल मुलाखती दरम्यान खोटे बोलू नका स्वत:ला परिपूर्ण सिद्ध करण्यासाठी नोकरीच्या मुलाखतीदरम्यान गोष्टींची अतिशयोक्ती करू नका. मुलाखतीत काहीही बोलण्यापूर्वी अनेक वेळा विचार करा. सत्य जाणून घेतल्यानंतर, नोकरी गमावण्याचा धोका असतो. त्यामुळे स्वतःच्या करिअरचा विचार करा आणि खोटं बोलू नको. स्पष्टपणे खरं बोला. कॉलेजला असताना MPSC चा अभ्यास कसा करायचा? तुमची मर्यादा समजून घ्या नोकरी मिळवण्यासाठी मुलाखतीत वरच्यावर बोलू नका. फक्त त्या उद्दिष्टांबद्दल आणि गोष्टींबद्दल बोला जे तुम्हाला साध्य करणं शक्य आहे. जे तुम्हाला करणं शक्य नाही अशा गोष्टींचा उल्लेखही करू नका. तुमच्या मर्यादा ओळखा आणि त्याप्रमाणे वर्तन करा. स्ट्रेंथबद्दल बोला मुलाखतकाराला तुमच्यास्ट्रेंथबद्दल सांगा. हे निश्चितपणे त्यांना तुम्हाला कामावर घेण्याबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करेल. तिथे बसून तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील तणावाची चर्चा करू नका. त्याऐवजी तुमच्यातील सुप्त गुण त्यांना सांगा. यामुळे तुमच्यातील टॅलेंट त्यांना समजेल आणि तुम्हाला जॉब मिळण्यास मदत होईल. गोल्डन चान्स! 10वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; आजच करा अर्ज आवश्यक तेवढंच बोला मुलाखत घेणार्‍या व्यक्तीला तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि चाचणी करायची आहे. पण तरीही तिथे जेवढं आवश्यक आहे तेवढंच बोला. जास्त बोलल्यामुळे कधी कधी तोंडातून चुकीच्या गोष्टीही बाहेर पडतात, त्यामुळे मिळणारी नोकरीही हातातून निसटू शकते. म्हजणूनच शक्य आणि आवश्यक तेवढंच बोला.
First published:

Tags: Career opportunities, Jobs, Tips

पुढील बातम्या