मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Interview Tips: मुलाखतीच्या आधी प्रचंड टेन्शन आलंय? मग या टिप्स फॉलो करून वाढेल आत्मविश्वास

Interview Tips: मुलाखतीच्या आधी प्रचंड टेन्शन आलंय? मग या टिप्स फॉलो करून वाढेल आत्मविश्वास

आज तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही बिनधास्त मुलाखत देऊ शकाल.

आज तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही बिनधास्त मुलाखत देऊ शकाल.

आज तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही बिनधास्त मुलाखत देऊ शकाल.

    मुंबई, 18 ऑगस्ट: जॉबसाठी (Latest Jobs) मुलाखत (Interview) म्हंटलं की भल्याभल्यांच्या अंगावर काटा येतो. मनात आणि डोक्यात अनेक विचार येतात. आपल्याला जॉब मिळेल का? मुलाखत घेणारा नक्की काय विचारणार? असे प्रश्न पडतात. याचमुळे टेन्शन येतं. मुलाखतीच्या वेळी टेन्शन (How to Reduce Tension in Interview) असल्यामुळे किंवा नर्व्हस असल्यामुळे अनेकजण चूक करतात आणि तो जॉब त्यांना मिळू शकत नाही. मात्र आता चिंता करू नका. आज माही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही बिनधास्त मुलाखत देऊ शकाल. चांगली मुलाखत देऊन जॉब मिळबण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे लुक्स (Looks). याकडे नेहमी लक्ष दिलं पाहिजे. मुलाखतीला जाताना तुमची दाढी असेल तर वाढलेली नाही ना याची काळजी घेतली पाहिजे. महिलांनी केस मोकळे न ठेवता नेहमी बांधून ठेवले पाहिजे. तसंच मेकअप न करता मुलाखत दिली पाहिजे. तुम्ही स्वतःला कसे सादर करता आणि तुमचा दृष्टिकोन मुलाखतीत तुमच्या यशासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे टेन्शन आलं असेल तरी तुमचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे. जर दृष्टिकोन सकारात्मक असेल तर तुम्हाला टेन्शन येणार नाही. हे वाचा - बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'या' पदांसाठी नोकरीची संधी; महिन्याला 1 लाख पगार 'फर्स्ट इंप्रेशन इज दि लास्ट इंप्रेशन' हे मुलाखतीचं सूत्र तुम्हाला माहितीच असेल. त्यामुळे तुमची लहान चूक तुमचा जॉब हिसकावून घेऊ शकते. त्यामुळे मुलाखत देताना किंवा देण्याच्या आधी टेन्शन असेल तर लांब श्वास घेऊनच मुलाखतीला जावं. यामुळे भीती वाटणार नाही. कॅज्युअल (Casual cloths) आणि फंकी कपडे घालून मुलाखतीला कधीही जाऊ नका कारण तुमचा पोशाख तुमच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे, म्हणून सुज्ञपणे कपडे निवडा आणि कपड्यांसह सभ्य दिसण्याचा प्रयत्न करा. नर्व्हस असणं काही वाईट नाही. मात्र काही लोकं टेन्शनमुळे मुलाखतीला जाताना काहीही खाऊन जात नाहीत. यामुळे आजारी पडण्याची भीती असते, त्यामुळे मुलाखतीला जाण्यापूर्वी काही खाऊन जाणं महत्त्वाचं आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    पुढील बातम्या