News18 Lokmat

एके काळी हॉटेलमध्ये फरशीही पुसली आज आहे IAS; महाराष्ट्राने देशाला दिला हा सर्वांत तरुण अधिकारी

महाराष्ट्राने देशाला दिला हा सर्वांत तरुण अधिकारी. देशात 371 वी रँक मिळवत तो 21 व्या वर्षीच IAS झाला. मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात राहणाऱ्या तरुणाच्या जिद्दीची ही गोष्ट.

News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2019 07:11 PM IST

एके काळी हॉटेलमध्ये फरशीही पुसली आज आहे IAS; महाराष्ट्राने देशाला दिला हा सर्वांत तरुण अधिकारी

मुंबई, 18 जुलै :  घरी पैशाची इतकी चणचण की, दोन वेळचं पोटभर खायलाही पैसे पुरायचे नाहीत. वडील रिक्षाचालक. जेमतेम शे-दोनशे रुपये कमवायचे आणि तेही रात्री दारूवर उडवायचे. मग घरी येऊन शिवीगाळ करायचे. अशा परिस्थितीतून अभ्यास करत तो मोठा झाला. शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रसंगी हॉटेलाम काम केलं आणि मेहनतीने UPSC दिली. देशात 371 वी रँक मिळवत तो IAS झाला आणि आता पश्चिम बंगालमध्ये विशेष पदावर कार्यरत आहे. मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात राहणाऱ्या तरुणाच्या जिद्दीची ही गोष्ट. वयाच्या 21 व्या वर्षी तो IAS झाला. देशातला सर्वात तरुण सनदी अधिकारी म्हणून गाजलेल्या - अन्सार अहम्मद शेख यांची ही प्रेरणादायी कहाणी.

अन्सार मराठवाड्यातल्या शेलगाव नावाच्या एका लहान गावात वाढला. बदनापूर तालुक्यातल्या या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकला. अभ्यासात हुशार असला, तरी शिक्षण सोडून त्यानं कामधंद्याला लागावं, अशी घरच्यांची इच्छा होती. कारण घरात पैशाची अडचण होती. वडील रिक्षा चालवायचे, पण त्यातून घराला पुरेसं उत्पन्न मिळत नव्हतं. आई मोलमजुरी करायची, तरी दोन वेळचं पोटभर अन्न मिळत नसे. "मग नातेवाईकांच्या सल्ल्याने वडिलांनी सांगितलं शाळा सोड आणि कामाला लाग. ते सांगायला वडील शाळेतही गेले. पण शिक्षकांनी त्यांना समजावलं. अन्सार हुशार आहे, त्याचं शिक्षण थांबवू नका, असं सांगितलं", अन्सार शेख एका मुलाखतीत सांगतात.

हे वाचा : कोण आहे भारताच्या विजयाचे हिरो? ज्यांनी कुलभूषण जाधवांच्या खटल्यासाठी घेतली फक्त 1 रुपया फी!

कसेबसे वडील तयार झाले आणि अन्सारची दहावीपर्यंतचं शिक्षण तरी पार पडलं. चांगले मार्क मिळाले, त्यामुळे बारावीपर्यंतचं शिक्षण घ्यायची परवानगी मिळाली. जिल्हा परिषदेच्या शाळेतच पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. अन्सारने मेहनतीने अभ्यास केला आणि 91 टक्क्यांच्या वर मार्क मिळवले. आसपासच्या कुणालाच कधी एवढे मार्क मिळाले नव्हते. त्यानंतर घरच्यांनी शिक्षण सोड म्हणून कधी सांगितलं नाही.

Loading...

शिक्षण पूर्ण करायला घरच्यांची ना नव्हती, तरी पैसेही नव्हते त्यांच्याकडे. मग पुढचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मिळेल ते काम अन्सारनं स्वीकारलं. काही काळ हॉटेलमध्ये रोजंदारीवर कामही केलं. तिथे कधी पाणी द्यायचं काम असे, तर कधी फरशी पुसायचं. पण तोपर्यंत अन्सारनं आपलं ध्येय निश्चित केलं होतं.

हे वाचा - SSB Interview सशस्त्र सीमा दलात 150 जागांवर व्हेकन्सी, 'असा' करा अर्ज

अन्सार शेखने दरम्यान ऑफिसर व्हायचा ध्यास घेतला होता. बारावीत असतानाच त्याला एक ब्लॉक ऑफिसर पदाला असलेला सरकारी अधिकारी भेटला. त्याच्यासारखं मोठं व्हायचं, हा ध्यास त्यानं घेतला. त्यासाठी काय करावं लागेल, कुठली परीक्षा द्यावी लागेल, याची माहिती मिळवली आणि UPSC द्यायचा त्याचा निर्णय पक्का झाला. पुण्यात पुढच्या तयारीसाठी अन्सार आला आणि दररोज मन लावून अभ्यास करू लागला. दिवसा काम आणि रात्री अभ्यास असं रुटीन सुरू होतं.

हे वाचा - एका रात्रीत झाले पैसे दुप्पट, शेअर बाजारातल्या महागुरूच्या या काही टिप्स

अन्सार शेख सांगतात, "UPSC च्या परीक्षेचा निकाल होता, त्याही दिवशी माझ्या खिशाल बाहेर खाण्याएवढे पैसे नव्हते. मित्रांनीच रिझल्ट पाहिला आणि माझं नाव यादीत दिसल्यावर पार्टी मागितली. खुशीनं मिठाई वाटण्याएवढे पैसे नव्हते तेव्हा, मग मित्रानंच मदत केली. मेहनतीचं फळ मिळालं याचाच जास्त आनंद होता. आता त्या मेहनतीच्या जोरावरच सगळं हाती आलंय."

अन्सार शेख यांनी 2015 मध्ये UPSC ची परीक्षा दिली. 2016 च्या बॅचचे ते IAS ऑफिसर आहेत आणि West Bengal Cadre मध्ये त्यांची नियुक्ती झाली आहे.

------------------------------------------------------------------------------

मला खल्लास केलं तुझ्या नादाने, आजीबाईंचा VIDEO तुफान व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 18, 2019 08:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...