Home /News /career /

हॅपी बर्थडे @Shiva : तो भारतीय, ज्याने सर्वात प्रथम ई-मेल बनवला आणि त्याचा कॉपीराइट घेतला

हॅपी बर्थडे @Shiva : तो भारतीय, ज्याने सर्वात प्रथम ई-मेल बनवला आणि त्याचा कॉपीराइट घेतला

1970 च्या दशकात टॉमलिन्सनने एका रूममध्ये ठेवलेल्या दोन संगणकांमधील संदेश पाठवण्याच्या तंत्राचा शोध लावला.

    नवी दिल्ली, 2 डिसेंबर : आज म्हणजेच 2 डिसेंबरला भारतीय वंशाच्या (Indian origin American) त्या व्यक्तीचा जन्म झाला, ज्याने 14 वर्षांपूर्वी ई-मेलचा आविष्कार (E-mail Invention) केला. पण ही कहाणी इतकी सरळ नाही. ज्यांना तंत्रज्ञानाच्या इतिहासाबद्दल (Tech History) माहिती आहे, त्यांच्या मनात जरुर प्रश्न पडला असेल की ईमेलचा गॉडफादर तर रे टॉमलिन्सनला (Ray Tomlinson) म्हटलं जातं आणि ते तर भारतीय वंशाचे नव्हते. 1970 च्या दशकात टॉमलिन्सनने एका रूममध्ये ठेवलेल्या दोन संगणकांमधील संदेश पाठवण्याच्या टेक्निकचे इन्व्हेन्शन केलं. होय, टॉमलिन्सनने हे काम जरूर केले आणि मुख्यतः या प्रणालीत “@” च्या वापराचं श्रेय त्यांना जातं, परंतु या कहाणीच्या खोलामध्ये काही इतरही रहस्य आहेत. आपणास जी. मार्कोनी आठवत असेल! होय, रेडिओच्या अविष्कारचा श्रेय ज्यांना दिलं जातं आणि डॉ. जगदीशचंद्र बोस यांच्या संशोधनाला महान मानलं जात नाही. अशीच कहाणी ईमेलची आविष्कारची देखील आहे. ही कहाणी आणि ई-मेलच्या शोधाबद्दल जाणून घेऊया. ई-मेल कधी तयार झाला? मुंबईत जन्म झालेल्या शिवा अय्युदुरईने ई-मेलचा शोध लावला होता आणि संशोधनाच्या जगातले आघाडीच्या विद्वानांमध्ये असलेले इतिहासकार लेखक नोआम चॉम्स्की यांनी देखील याला दुजोरा दिला आहे. ऑफिसमधील संवादासाठी इलेक्ट्रॉनिक वर्जनचा हायस्कूलच्या वयातच 1979 मध्ये शिवाने शोध लावला होता त्याला “ई-मेल” असं नाव दिलं आणि 1982 मध्ये त्याचा कॉपीराइट देखील घेतला होता. मार्कोनीकडे पेटंट होतं त्यामुळे त्याच्याविरुद्धच्या लढ्यात बोसांची बाजू कमकुवत ठरली. परंतु मार्कोनीच्या आधी दोन वर्षे बोस यांनी रेडिओचा शोध लावला होता. या प्रकरणात शिवासाठी त्याचा अमेरिकेतील एक दस्तावेज त्याच्या लढाईत उपयोगी ठरलं. कसे तयार केले ईमेल? जुन्या काळात जसे मेमो लिहिलेले असायचे कार्बन कॉपी, एक बीसीसी आणि ओरिजनल कॉपी लिहायचे, आणि "To", या पॅटर्नवर ई-मेलची सुरुवात झाली, ज्याला इलेक्ट्रॉनिक मेसेज मॅनेजमेंट म्हणून शिवाने जगासमोर आणलं. न्यूजर्सीमध्ये 1978 मध्ये मेडिसिन आणि डेंटिस्ट्री कॉलेजमध्ये शिवाने हे डेव्हलप केलं. 30 ऑगस्ट 1982 रोजी अमेरिकन सरकारने या संशोधनासाठी शिवाला अधिकृत कॉपीराइट दिला. त्यावेळी कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि कोडसाठी यूएसमध्ये पेटंट मिळत नव्हतं म्हणून त्यांना कॉपीराइट मिळाला. यानंतर हे तर सर्वांनाच माहीत आहे की 80 व्या दशकानंतर ईमेल जगभरात खूप लोकप्रिय झाला. विकसित झाल्यानंतर ईमेलचे बेसिक फीचर तेच होते, जे 1978 मध्ये होते. फक्त '@' चे चिन्ह युनिव्हर्सल झालं, ज्याचे श्रेय टॉमलिन्सनला जातं. ईमेलबद्दल एक थियरी सांगतात की हे 1960 च्या दशकात ईमेल विकसनाच्या पहिल्या टप्प्यात होता आणि त्याचा शोध असा कधी लावलाच गेला नाही पण तो आपोओप विकसित होत गेला. शिवाबद्दल जाणून घेण्यापूर्वी ईमेलबद्दल काही मजेदार फॅक्ट्सदेखील जाणून घ्या. - जगात प्रत्येक सेकंदला 28 लाख ईमेल सेंड होतात. 2019 मध्ये 294 अब्ज ईमेल सेंड केले गेले. - एका दिवसात लोक सरासरी 15 वेळा ईमेल चेक करतात. - जगाचे 86% प्रोफेशनल्सनी ईमेलला आपल्या पसंतीचं संवाद माध्यम म्हटलंय. - ऑफिसमध्ये काम करणार्‍या एक प्रोफेशनलला 122 ईमेल येतात आणि तो 40 ईमेल पाठवतो. - 2019 मध्ये अमेरिकामध्ये 66% ईमेल मोबाइल फोनवर वाचले गेले. - जगात 2019 मध्ये 60% ईमेल स्पॅम मानले गेले. - जगभरात एका व्यक्तीकडे सरासरी 1.8 म्हणजेच किमान 2 ईमेल अकाऊंट आहेत. कोण आहे शिवा आणि किती पॉप्युलर आहे? अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स टेक्नोलॉजी इंस्टिट्यूट (MIT) कडून पीएचडी सोबत चार डिग्र्या मिळवणाऱ्या शिवांबद्दल लोकांची संमिश्र मतं आहेत. एके ठिकाणी, अमेरिकेच्या 'ईमेलचा संशोधक' म्हणून त्यांना लोक ओळखतात, तर त्यावेळेस शिवाला ढोंगी समजणारेही अनेक जण आहेत आणि कोणी तरी ईमेलच्या नावावर काही रजिस्टर केले तर त्याला संशोधन म्हणत नाही, अशी खिल्ली उडवतात. सोबतच शिवाने अनेक लोकांवर अब्रुनुकसानीच्या केसेस केल्या आहेत कारण ते शिवाच्या संशोधनाविरुद्ध प्रचार करत होते. चॉम्स्की यांनी एमआयटीमध्ये शिवाला पाठिंबा देत सांगितले की '1978 मध्ये जो ईमेल बनवला गेला, त्याचे फॅक्ट्स विवादास्पद नाहीत आणि ईमेलची मूलभूत कन्सेप्ट तीच आहे.' यामुळे शिवाचा दावा निर्विवाद ठरला. मिलेनियम सायबरनेटिक्स कंपनी सुरू करणाऱ्या शिवा यांनी भारतमधील सर्वात मोठी सायन्स एजन्सी सीएसआयआर (CSIR) मध्ये देखील काम केले आहे आणि जेनेटिक फूड प्रोग्रामसाठी देखील त्यांचं नाव चर्चेत असतं. याव्यतिरिक्त, शिवा यांनी अमेरिकेत निवडणूकही लढवली होती. प्रथम रिपब्लिकन पार्टी आणि पुन्हा स्वतंत्रपणे निवडणुकी लढताना त्यांना फार यश मिळाले नाही, पण एक टेक एक्सपर्ट म्हणून त्यांना ओळखतात.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या