मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

अभिमानास्पद! 'या' भारतीय वैज्ञानिकाचा यंग साइंटिस्ट अवॉर्डने सन्मान

अभिमानास्पद! 'या' भारतीय वैज्ञानिकाचा यंग साइंटिस्ट अवॉर्डने सन्मान

यंग साइंटिस्ट पुरस्कार (TWAS-CAS) देऊन भारतीय शास्रज्ञ प्रा. परमेश्वर अजित (Professor Parmeshwaran Ajith) यांना गौरवण्यात आलं.

यंग साइंटिस्ट पुरस्कार (TWAS-CAS) देऊन भारतीय शास्रज्ञ प्रा. परमेश्वर अजित (Professor Parmeshwaran Ajith) यांना गौरवण्यात आलं.

यंग साइंटिस्ट पुरस्कार (TWAS-CAS) देऊन भारतीय शास्रज्ञ प्रा. परमेश्वर अजित (Professor Parmeshwaran Ajith) यांना गौरवण्यात आलं.

  • Published by:  Kranti Kanetkar
नवी दिल्ली, 30 डिसेंबर: इटलीतील वर्ल्ड ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या (World Academy of Sciences) वतीने फिजिक्स विषयातील योगदानाबद्दल देण्यात येणारा यंग साइंटिस्ट पुरस्कार (TWAS-CAS) देऊन भारतीय शास्रज्ञ प्रा. परमेश्वर अजित (Professor Parmeshwaran Ajith) यांना गौरवण्यात आलं. प्रा. अजित हे इंटरनॅशनल सेंटर फॉर थेरॉटिकल सायन्सेस ऑफ द टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये (International Centre for Theoretical Sciences of the Tata Institute of Fundamental Research(ICTS-TIFR) प्राध्यापक आहेत. फिजिक्स आणि गुरुत्वाकर्षण लहरींचं ॲस्ट्रोफिजिक्स या विषयावर अजित यांनी संशोधन केलं आहे. विशेष म्हणजे महान शास्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांनी (Albert Einstein) अनेक वर्ष आधीच या लहरींबद्दलचा अंदाज व्यक्त केला होता. विकसनशील देशांतील शास्रज्ञांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. अजित म्हणाले, ‘ मला आयुष्यात उत्तम शिक्षक आणि विद्यार्थी मिळाले त्यांनी साथ दिल्यामुळेच माझं संशोधनाचं काम पूर्ण झालं.’ 2015 मधील LIGO ऑब्जर्वेशनमध्ये या लहरींचा शोध लागला होता. अजित 2004 पासून LIGO साइंटिफिक कॉलेबोरेशनचे सदस्य आहेत. ICTS-TIFR च्या संशोधन करणाऱ्या शास्रज्ञांनी या शोधात मोठं योगदान दिल आहे. ग्रॅव्हिटेशनल वेब ऑब्झर्व्हेशनमधून मिळालेली आइनस्टाइन थेअरी तपासून पाहण्याचा एक मार्ग या शास्रज्ञांनी शोधून काढला आहे. त्याचबरोबर ज्या ब्लॅकहोल्समुळे या लहरी तयार होतात त्यांचा अभ्यास करण्याची पद्धतीही यांनी विकसित केली आहे. हे वाचा-देदीप्यमान कामगिरी! खाटीक समाजातील पहिली महिला पायलट होण्याचा पटकवला मान वर्ल्ड ॲकॅडमी ऑफ सायन्सेस इटलीतील ट्रीस्टेमध्ये आहे. विकसनशील देशांतील संशोधन, शिक्षण, धोरण आणि मुत्सदेगिरी याला पाठिंबा देण्याचं काम ही संस्था करते. TWAS-CAS यंग साइंटिस्ट हा पुरस्कार 2020 साली सुरू झाला आहे. विशेष म्हणजे 45 वर्षांहून मोठ्या शास्रज्ञांना हा पुरस्कार दिला जात नाही. या वर्षी पहिल्यांदाच पुरस्कार देताना त्यामध्ये फिजिकल सायन्सेस क्षेत्राचा सम्मान करण्यात आला. तरुण शास्रज्ञाचा गौरव झाल्यामुळे आतंरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली आहे. यामुळे भविष्यातील शास्रज्ञांना उत्तम काम करण्याची प्रेरणा मिळणार आहे. भारतात खूप प्रतिभा आहे तिला प्रोत्साहन देण्यासाठी असे पुरस्कार दिले गेले पाहिजेत.
First published:

पुढील बातम्या