नवी दिल्ली, 5 जून: गेल्या काही महिन्यांपासून देशातील अनेक भागांत कोरोनाने (Corona) कहर केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक शहरं, जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन तसेच कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. याचा थेट परिणाम शिक्षण व्यवस्था आणि रोजगारावर झाला आहे. इयत्ता 10 वी, 12 वी तसेच पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तरुण रोजगाराच्या शोधात आहेत. त्यात शासकीय नोकरीच्या (Government Jobs) शोधात असलेल्या युवकांसाठी ही एक चांगली बातमी आहे.
भारतीय रेल्वेने (Indian Rail) शासकीय नोकरीच्या शोधात असलेल्या 10 वी पास युवकांसाठी शानदार संधी देऊ केली आहे. दक्षिण रेल्वेने ( Southern Railway) अॅप्रेंटिसशीपअंतर्गत अनेक पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण 3378 पदे भरली जाणार आहेत. यात पेराम्बूरसाठी 936 कॅरेज वर्कर्सची, गोल्डनरॉक वर्कशॉपमध्ये 756 पदे, पोदनूरसाठी सिग्नल आणि टेलिकॉम वर्कशॉपसाठी 1386 पदांची भरती केली जाणार आहे.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुकांनी दक्षिण रेल्वेच्या sr.indianrailways.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करावेत, असे आवाहन सूत्रांनी केले आहे. या पदांसाठी इच्छुकांकडून इयत्ता 10 वी पास झाल्याचे प्रमाणपत्र तसेच आयटीआयचे (ITI) प्रमाणपत्र देखील मागवण्यात आले आहे.
या आहेत महत्वपूर्ण तारखा
अर्ज प्रक्रियेस सुरुवात – 01 जून 2021
ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत – 30 जून 2021
अप्रेंटिसशीप (Apprentice) पदांचा तपशील
कॅरेज वर्क्स, पेराम्बूर – 936
गोल्डन रॉक वर्कशॉप – 756
सिग्नल आणि टेलिकॉम वर्कशॉप – 1686
हे ही वाचा:बॅकबेंचर बनला IAS ऑफिसर; कुमार अनुराग यांच्या स्वप्नांचा प्रवास
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी इच्छूक उमेदवार हा इयत्ता 10 वी किंवा इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावा, तसेच त्याच्याकडे मान्यताप्राप्त संस्थेचे आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
दक्षिण रेल्वेमध्ये अॅप्रेंटिससाठी वयोमर्यादा
अॅप्रेंटिस पदांसाठी 15 ते 24 वर्ष वयोगटातील युवक अर्ज करु शकतात. आरक्षित वर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
दक्षिणे रेल्वेमधील अॅप्रेंटिस पदांसाठी मिळणारे वेतन
10 वी उत्तीर्ण फ्रेशर्स – 6000 रुपये प्रतिमहिना
12 वी उत्तीर्ण फ्रेशर्स – 7000 रुपये प्रतिमहिना
एक्स आयटीआय – 7000 रुपये प्रतिमहिना
या राज्यांमधील उमेदवार करु शकतात अर्ज
दक्षिण रेल्वेत सुरु करण्यात आलेल्या पदभरती प्रक्रियेसाठी केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी, अंदमान निकोबार आणि लक्षव्दीप द्वीपसमूह, तमिळनाडू, केरळसह आंध्र प्रदेशातील एसपीआर नेल्लोर आणि चित्तूर जिल्ह्यातील उमेदवार अर्ज करु शकतात. त्याचबरोबर दक्षिण कर्नाटकातील एका जिल्ह्यातील म्हणजेच दक्षिण कन्नड मधील उमेदवार देखील या पदांसाठी अर्ज करु शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Job, Railway jobs