मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Post recruitment: दहावी पास झालेल्यांसाठी पोस्टात भरती; 'असा' करा अर्ज

Post recruitment: दहावी पास झालेल्यांसाठी पोस्टात भरती; 'असा' करा अर्ज

ग्रामीण डाकसेवकांची भरती 1940 पदांवर होणार आहे. वाचा सविस्तर

ग्रामीण डाकसेवकांची भरती 1940 पदांवर होणार आहे. वाचा सविस्तर

ग्रामीण डाकसेवकांची भरती 1940 पदांवर होणार आहे. वाचा सविस्तर

    पाटणा, 7 जुलै: बिहारमध्ये (Bihar) पोस्ट खात्यात (Post Office) शाखा पोस्टमास्तर (Branch Postmaster), पोस्टमास्तर सहायक (Assistant Postmaster) आणि ग्रामीण डाकसेवक (Gramin Daksevak - GDS) या पदांकरिता रिक्त जागांवर (Vacant Posts) भरती प्रक्रिया (Recruitment in Post) सुरू आहे. या पदांकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून होती; मात्र ती वाढवून 14 जुलै 2021 अशी करण्यात आल्याचं नोटिफिकेशन पोस्ट खात्याने अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केलं आहे. त्या हवाल्याने 'आज तक'ने त्याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

    ग्रामीण डाकसेवकांची भरती 1940 पदांवर होणार आहे. 18 ते 40 वर्षे या वयोगटातल्या व्यक्ती या पदांकरिता अर्ज करू शकतात. आर्थिक मागास वर्गातल्या (Economnically Weaker Section) उमेदवारांना वयोमर्यादेत कोणतीही शिथिलता नाही; मात्र SC, ST, OBC, दिव्यांग आदी वर्गांतल्या उमेदवारांना नियमानुसार लागू असलेली वयोमर्यादेतली शिथिलता देण्यात येणार असल्याचं नोटिफिकेशनमध्ये म्हटलं आहे. अर्जाकरिता 100 रुपये शुल्क असून, महिला, तृतीयपंथीय, तसंच दिव्यांग व्यक्तींना हे शुल्क भरावं लागणार नाही, असा उल्लेख नोटिफिकेशनमध्ये करण्यात आला आहे.

    ग्रामीण डाकसेवक या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त शाळेतून 10वीची परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तसंच, इंग्रजी आणि स्थानिक भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. त्याप्रमाणेच सायकल चालवता येणं गरजेचं असून, कम्प्युटरचं प्राथमिक ज्ञानही असणं आवश्यक असल्याचं नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. शाखा पोस्टमास्तर, पोस्टमास्तर सहायक आणि ग्रामीण डाकसेवक या पदांनुसार कमीत कमी 10 ते 12 हजार रुपयांचं मासिक वेतन दिलं जाणार आहे.

    बेगुसराय, भागलपूर, कटिहार मुंगेर, नालंदा, नवादा, पूर्णिया, सहरसा, समस्तिपूर, दरभंगा, पूर्व चंपारण्य, मधुबनी, औरंगाबाद, पाटणा, गया, भोजपूर, पाटनासाहिब, रोहतास, वैशाली, सिवान, सीतामढी या बिहारच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतल्या टपाल कार्यालयांमध्ये ही भरती केली जाणार आहे.

    याबद्दलची अधिक माहिती पोस्ट खात्याच्या अधिकत वेबसाइटवर उपलब्ध आहे. उमेदवारांची पात्रता, त्यांना दिलं जाणार असलेलं वेतन वगैरे गोष्टींबद्दलची सविस्तर माहिती वेबसाइटवरच्या निवेदनात देण्यात आली आहे. या भरतीची मुदत 14 जुलैपर्यंत वाढली असल्याने अनेक गरजू व्यक्ती त्याचा लाभ घेऊ शकतात. यासाठी ऑनलाइन अर्ज करणं गरजेचं आहे.

    अधिक माहिती मिळवण्यासाठी, तसंच ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://appost.in/gdsonline/home.aspx या लिंकवर क्लिक करावं.

    First published:
    top videos

      Tags: Job alert, Post office