Home /News /career /

IOCL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी, 1 लाखांपेक्षा जास्त पगार!

IOCL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी, 1 लाखांपेक्षा जास्त पगार!

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (Indian Oil Corporation Ltd.) ज्युनिअर इंजिनिअर असिस्टंट पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. आयओसीएलच्या (IOCL) अधिकृत वेबसाईटवर ही अधिसूचना उपलब्ध आहे.

मुंबई, 30 जानेवारी : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (Indian Oil Corporation Ltd.) ज्युनिअर इंजिनिअर असिस्टंट पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. आयओसीएलच्या (IOCL) अधिकृत वेबसाईटवर ही अधिसूचना उपलब्ध आहे. एकूण 16 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया २८ जानेवारीपासून सुरु झाली असून अधिकृत वेबसाईटवर iocrefrecruit.in ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. १९ फेब्रुवारी ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. महत्वाच्या तारखा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू व्हायची तारीख - २८ जानेवारी २०२१ अर्ज करण्याची अंतिम तारीख - १९ फेब्रुवारी २०२१ लेखी परीक्षेची अपेक्षित तारीख - २८ फेब्रुवारी २०२१ निकाल जाहीर होण्याची तारीख - ९ मार्च २०२१ शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून केमिकल/ रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंगमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा किंवा बीएससीची (गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि औद्योगिक रसायनशास्त्र या विषयात) पदवी असणे आवश्यक आहे. जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी उमेदवारांसाठी किमान ५० टक्के गुण आवश्यक आहेत. तर अनुसुचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांसाठी ४५ टक्के गुण असणे आवश्यक आहे. वयो मर्यादा (Age Limit) अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे तर जास्तीत जास्त वय २६ वर्षे यामध्येच असावे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना जास्तीत जास्त वयात ३ वर्षे, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी जास्तीत जास्त वयात ५ वर्षांची सवलत देण्यात आली आहे. त्यासोबतच प्रत्येक प्रवर्गातील उमेदवारांना त्यांच्या अनुभवाच्या बरोबरीने जास्तीत जास्त वयात सवलत दिली जाईल. निवड प्रक्रिया (Selection Process) लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. प्रवर्गनिहाय आणि पदनिहाय गुणवत्ता यादी तयार केली जाईल, जी लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर असेल. एकूण पगार आयओसीएलच्या ज्युनिअर इंजिनिअर असिस्टंट पदांच्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला महिन्याला 25,000 ते 1,05,000 रुपये पगार मिळणार आहे. असा करा अर्ज 1. उमेदवाराला सर्वात आधी आयओसीएलच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल- iocrefrecruit.in 2. होमपेजवर दिलेल्या 'Recruitment' लिंकवर क्लिक करा. 3. क्लिक केल्यानंतर पुढील टॅबवर पुनर्निर्देशित 'Redirect' केले जाईल. 4. याठिकाणी 'Apply now' या बटनावर क्लिक करा. 5. 'Apply now' वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सूचना व्यवस्थित वाचाव्या लागतील. त्यानंतर संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरुन 'Next' बटणावर क्लिक करा. 6. शेवटी अर्ज व्यवस्थित तपासून 'Submit' करा.
First published:

पुढील बातम्या