Indian Navy Recruitment: भारतीय नौदलात तब्बल 2500 जागांसाठी जम्बो भरती

Indian Navy Recruitment: भारतीय नौदलात तब्बल 2500 जागांसाठी जम्बो भरती

Indian Navy Recruitment 2021: भारतीय नौदलात सेलर पदाच्या 2500 जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 एप्रिल: तरुणांसाठी नोकरीची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय नौदलात सेलर पदाच्या 2500 जागांसाठी भरती (Indian Navy Salor Recruitment) प्रक्रिया होत आहे. सायन्स स्ट्रीममधून 12वी पास असलेल्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. एकूण 2500 पदांसाठी ही भरती (2500 post vacancies) प्रक्रिया होत असून यामध्ये 500 सेलर एए (Artificer Apprentice) तर 2000 सेलर एसएसआर (Senior Secondary Recruits) पदांचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासची सरुवात 26 एप्रिल 2021 पासून होत आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2021 आहे.

पदांची सविस्तर माहिती

आर्टिफिशर अ‍ॅप्रेंटिस सेलर (Sailor AA) - 500 रिक्त पदे

सिनिअरी सेकंडरी रिक्रुएटर (Sailor SSR) - 2000 रिक्त पदे

एकुण पदांची संख्या 2500

दरवर्षी भारतीय नौसेनेकडून आर्टिफिशर अ‍ॅप्रेंटिस (एए) आणि सिनिअर सेकेंडरी रिक्रुएटर (एसएसआर) साठी नाविकांची भरती सेलर्स एन्ट्रीची प्रक्रिया पार पडते.

योग्यता

या भरती प्रक्रियेसाठी इच्छूक उमेदवार हा मान्यताप्राप्त शैक्षणिक विद्यापीठातून गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र किंवा कम्प्युटर सायन्स या विषयांसह कमीत कमी 60 टक्के गुणांसह 12वी उत्तीर्ण असावा. इच्छूक उमेदवार हा 1 फेब्रुवारी 2001 ते 31 जुलै 2004 या कालवधीत जन्मलेला असावा.

क्रीडा क्षेत्रात सरकारी नोकरीची संधी; विविध खेळांसाठी प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक हवे आहेत!

निवड प्रक्रिया

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला लेखी परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर फिजिकल टेस्ट आणि मेडिकल टेस्टच्या आधारावर निवड करण्यात येईल. भारतीय नौसेनेद्वारे घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेचे आयोजन हे देशभरातील विविध 31 परीक्षा केंद्रावर केलं जातं. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर पात्र उमेदवारांना फिजिकल टेस्टसाठी बोलवण्यात येतं. त्यानंतर या टेस्टमध्ये पास झाल्यास मेडिकल टेस्ट होते.

अर्ज कसा करावा?

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आपला अर्ज दाखल करावा. भरती प्रक्रिया 26 एप्रिल 2021 पासून सुरू होत आहे. इच्छूक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती प्रक्रियेची संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी आणि मगच आपला अर्ज दाखल करावा.

Published by: Sunil Desale
First published: April 22, 2021, 7:11 PM IST

ताज्या बातम्या