Indian Navy मध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या कसं कराल अप्लाय

Indian Navy मध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या कसं कराल अप्लाय

जर तुम्हाला भारतीय नौदलात सहभागी व्हायचे आहे तर ही तुमच्यासाठी सर्वोत्तम संधी आहे.

  • Share this:

जर तुम्हाला भारतीय नौदलात सहभागी व्हायचे आहे तर ही तुमच्यासाठी सर्वोत्तम संधी आहे. नौदलात एक्झिक्युटिव्ह अँड टेक्निकल ब्रान्चच्या पदांसाठी योग्य उमेदवार शोधत आहेत. १०२ जागांसाठी या भरती होणार आहेत. १२ जानेवारीपासून या पदासांठी अर्ज घेण्यात येणार आहेत. १ फेब्रुवारीपर्यंत उमेदवार त्यांचा अर्ज ऑनलाइन भरू शकतात.

योग्यता- ऑफिसरच्या या पदांसाठी उमेदवारांनी संबंधीत ट्रेंडमध्ये बीई किंवा बीटेक करणं गरजेचं आहे.

वयाची मर्यादा- या पदांसाठी आवेदन करण्यासाठी उमेदवारांचा जन्म २ जानेवारी १९९५ ते १ जुलै २००० मध्ये असणं आवश्यतक आहे.

अर्जाची फी- निशुल्क

असं करा अप्लाय- नेवी ऑफिसरच्या या पदांसाठी उमेदवारांना इंडियन नेवीच्या अधिकृत वेबसाइट www.joinindiannavy.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकता. अर्ज केल्यानंतर उमेदवार पूर्ण भरलेल्या अप्लिकेशन फॉर्मची प्रिन्ट आऊट स्वतः जवळ ठेवू शकतात.

ऑनलाइन अर्जासाठीची डायरेक्ट लिंक- https://www.joinindiannavy.gov.in/en/account/login


VIDEO : ...म्हणून इरफानला त्याचे बाबा, ‘पठाणाच्या घरी ब्राह्मण जन्माला आला म्हणायचे’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 10, 2019 07:28 AM IST

ताज्या बातम्या