मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

भारतीय आयटी सेक्टरमध्ये लाखो नोकऱ्यांची संधी! इन्फोसिसच्या सह-संस्थापकांनी दिली माहिती

भारतीय आयटी सेक्टरमध्ये लाखो नोकऱ्यांची संधी! इन्फोसिसच्या सह-संस्थापकांनी दिली माहिती

Indian IT Industry

Indian IT Industry

मूनलायटिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. असं असलं तरीही आयटी क्षेत्रातून एक चांगली बातमी समोर आली आहे. आयटीमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही बातमी दिलासा देणारी आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : आर्थिक मंदीच्या संकटाची चाहूल लागल्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्माचारी कपात सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांत फेसबुक, मेटा, अॅमेझॉन आणि ट्विटरसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. सर्वाधिक कर्माचारी कपता ट्विटर आणि फेसबुक या मोठ्या कंपन्यांमध्ये झाली आहे. या दोन कंपन्यांतील हजारो कर्मचाऱ्यांनी आपली नोकरी गमावली आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारतीय आयटी क्षेत्र मात्र वेगळ्याच मुद्द्यामुळे चर्चेत आहे. भारतीय कंपन्यांमध्ये 'मूनलायटिंग' ही एक मोठी समस्या बनली आहे. ज्यामुळे अनेक आयटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. विप्रो, एचसीएल, टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि टीसीएससारख्या आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी 'मूनलायटिंग' वर्क कल्चरबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मूनलायटिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. असं असलं तरीही आयटी क्षेत्रातून एक चांगली बातमी समोर आली आहे. आयटीमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही बातमी दिलासा देणारी आहे. ‘टीव्ही 9 भारत वर्ष’नं या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हेही वाचा - Twitter Mass Resignation : ट्विटरवर आली ऑफिसेस बंद करण्याची वेळ; कर्मचाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे

इन्फोसिस या आयटी कंपनीचे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णन यांनी नोकरी शोधणाऱ्या तरुणांना आशेचा किरण दाखवला आहे. बेंगळुरू टेक समिटच्या 25व्या एडिशनमध्ये ते बोलत होते. क्रिस गोपालकृष्णन म्हणाले की, महागाई आणि अमेरिकेतील मंदी यांसारख्या समस्यांमध्ये भारतीय आयटी क्षेत्रात दोन लाख नवीन कर्मचाऱ्यांना नोकरी मिळेल.

म्हैसूर, मंगळुरु, बेळगाव आणि हुबळी येथे छोटी कार्यालयं सुरू करून आयटी कंपन्या आव्हानांवर मात करत आहेत. त्यामुळे आयटी क्षेत्राची सुरक्षितपणे वाढ होईल, असं इन्फोसिसचे सह-संस्थापक म्हणाले. त्यांनी भारतातील सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) आणि ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) सारख्या खासगी उद्योजकांच्या अद्वितीय मॉडेल्सचं कौतुकही केलं. ही मॉडेल्स विकसनशील अर्थव्यवस्थांमधील लोकांना जलद विकास आणि सेवांमध्ये प्रवेश करण्यास सक्षम करतील, असं गोपालकृष्णन म्हणाले.

"भारतीय आयटी क्षेत्रामध्ये 220 अब्ज डॉलर्स कमाईच्या आधारावर 8 ते 10 टक्के दराने वाढ होण्याची अपेक्षा आहे. AI/ML, ब्लॉकचेन, वेब 3.0, मेटाव्हर्स सह टेक्नॉलॉजी सेक्टर प्रगती करत आहे. त्यामुळे भविष्यात हा उद्योग वाढतच जाईल, असा माझा विश्वास आहे. लेऑफमधील चढउतार फारच अल्पकालीन आहेत. त्यामुळे मी भविष्याबद्दल खूप आशावादी आहे," असंही क्रिस गोपालकृष्णन म्हणाले.

First published:

Tags: Job alert