Home /News /career /

अनोखं पाऊल! ही भारतीय कंपनी कर्मचाऱ्यांना देतीये 'झोपेसाठी वेळ'; ऑफिसमध्येच मिळणार बेड आणि रूमही

अनोखं पाऊल! ही भारतीय कंपनी कर्मचाऱ्यांना देतीये 'झोपेसाठी वेळ'; ऑफिसमध्येच मिळणार बेड आणि रूमही

वेकफिट स्टार्टअप स्वतः स्लीपिंग वेलनेस क्षेत्रात काम करतं आणि 6 वर्षात ही एक अतिशय यशस्वी कंपनी आहे. ते नेहमी झोपेला गांभीर्याने घेत असल्याचं त्यांनी आपल्या घोषणेमध्ये म्हटलं आहे.

    बंगळुरू 06 मे : बर्‍याचदा तुम्ही लोकांना असं म्हणताना ऐकलं असेल की मला ऑफिसमध्ये थोडावेळ आराम करायला मिळाला असता तर किती बरं झालं असतं! आता सर्वत्र नाही मात्र आपल्या देशातील बंगळुरूस्थित एक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांचं हे स्वप्न पूर्ण करत आहे. Wakefit नावाच्या या कंपनीने अधिकृत मेलद्वारे सर्वांना सांगितलं आहे की कंपनी त्यांना दुपारी अर्धा तास झोप घेण्यासाठी वेळ देत आहे (Company is Giving 30 Minute official Nap Time to Employees). IMP News! भारतात लवकरच लागू होणार 4 दिवसांचा आठवडा? कसं असेल स्वरूप? तज्ज्ञ म्हणतात... वेकफिटचे सह-संस्थापक चैतन्य रामलिंगगौडा यांनी कंपनीच्या वतीने मेलद्वारे एक घोषणा जारी केली आहे. संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांना दररोज दुपारी 2 ते 2.30 पर्यंत झोपण्याची वेळ देण्यात येईल (Napping Time At Office), असं स्पष्टपणे ई-मेलमध्ये लिहिलं आहे. यादरम्यान, सर्व कर्मचाऱ्यांचे कॅलेंडर ब्लॉक केले जातील आणि प्रत्येकजण शांतपणे झोपू शकेल. ही घोषणा संस्थेने ट्विटरवर देखील पोस्ट केली आहे, त्यानंतर लोक संस्थेचं कौतुक करत आहेत. वेकफिट स्टार्टअप स्वतः स्लीपिंग वेलनेस क्षेत्रात काम करतं आणि 6 वर्षात ही एक अतिशय यशस्वी कंपनी आहे. ते नेहमी झोपेला गांभीर्याने घेत असल्याचं त्यांनी आपल्या घोषणेमध्ये म्हटलं आहे. अशा परिस्थितीत ते आता ऑफिसमध्येही नॅप टाईमला सुरुवात करत आहेत. चैतन्य यांनी नासाच्या अभ्यासाचा हवाला देत म्हटलं आहे की, 26 मिनिटांच्या झोपेमुळे परफॉर्मन्स 33 टक्क्यांनी वाढू शकतो. अशा परिस्थितीत, आम्हाला ही प्रॅक्टिस सामान्य करायची आहे आणि आतापासून ऑफिसमध्ये झोपण्यासाठी कर्मचाऱ्यांना 30 मिनिटं दिली जातील. या काळात कोणतंही काम केलं जाणार नाही. क्या बात है! नोकरीसोबत 'छोकरा-छोकरी'ही देते ही भारतीय कंपनी; लग्न करताच वाढते Salary कंपनीच्या मेलमध्ये असं सांगण्यात आलं आहे की कंपनी या प्रकल्पावर काम करत आहे आणि लवकरच कर्मचार्‍यांना झोपण्यासाठी एक शांत जागा आणि आरामदायी नॅप पॉड बनवून दिले जातील, जिथे ते शांतपणे झोपू शकतील. या पोस्टनंतर, इंटरनेटवर लोकांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की तुम्ही भारतीय मार्केटमध्ये एक नवीन ट्रेंड चालवत आहात. जपानमध्ये लोकांना ऑफिसमध्ये झोपण्यासाठी वेळ देण्याचा ट्रेंड जुना आहे. येथे तुम्हाला फक्त ऑफिसमध्येच नाही तर अनेक सार्वजनिक ठिकाणीही झोपण्याची जागा मिळेल कारण जपानी लोक शारीरिक आणि मानसिक आरोग्याला खूप महत्त्व देतात.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Job, Sleep

    पुढील बातम्या