नवी दिल्ली, 4 जानेवारी : तुम्ही जर 12 वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही चांगली संधी आहे. इंडियन कोस्ट गार्ड म्हणजेच भारतीय सागरी सुरक्षा दल 260 पदांवर भरती करणार आहे. यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी joinindiancoastguard.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. 2 फेब्रुवारी 2020 पर्यंत उमेदवार इथे अर्ज करू शकतील.
अशी असेल निवड प्रक्रिया
इंडियन कोस्ट गार्डच्या या जागांसाठी 12 वीचे गुण ग्राह्य धरले जातील. या उमेदवारांना लेखी परीक्षा आणि फिजिकल फिटनेस टेस्ट (PFT) आणि मेडिकल स्टँडर्ड टेस्ट देता येईल. ज्यांची निवड होईल अशा उमेदवारांना ऑगस्ट 2020 मध्ये प्रशिक्षण दिलं जाईल.
Indian Coast Guard notification: पात्रतेच्या अटी
अर्जदाराचं कमीत कमी वय 18 आणि जास्तीत जास्त वय 22 वर्षांचं हवं. SC/ST श्रेणीच्या उमेदवारांच्या वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट असेल. OBC श्रेणीच्या उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट मिळेल.
शैक्षणिक योग्यता
उमेदवाराने कोणत्याही शैक्षणिक बोर्डाची बारावीची परीक्षा 50 टक्क्यांनी उत्तीर्ण केलेली असावी. बारावीमध्ये त्या विद्यार्थ्याने गणित आणि भौतिकशास्त्र विषयाचं शिक्षण घेतलेलं असावं ही यातली प्रमुख अट आहे. आरक्षित श्रेणीच्या उमेदवारांना यात 5 टक्के गुणांची सवलत असेल.
भारताच्या सागरी सुरक्षेच्या दृष्टीने इंडियन कोस्ट गार्ड हे एक महत्त्वाचं दल आहे. या सुरक्षा दलात काम करून देशसेवा करण्याची एक चांगली संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळेच तुम्ही 12 वी पास असाल आणि या शैक्षणित पात्रतेच्या अटी पूर्ण असतील तर तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करू शकता.
=======================================================================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career