भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी; 10वी पासही करू शकतो अर्ज

भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी; 10वी पासही करू शकतो अर्ज

भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Gaurd) नाविक पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत, यामध्ये 10 वी पास उमेदवारदेखील अर्ज करू शकतो.

  • Share this:

मुंबई, 03 डिसेंबर : भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Gaurd) नाविक पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत, यामध्ये 10 वी पास उमेदवारदेखील अर्ज करू शकतो. देशांतर्गत शाखेसाठी कूक आणि स्टीव्हर्ड या पदांसाठी ही भरती होणार असून भारतीय तटरक्षक दलाच्या joinindiancoastguard.gov.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी 7 डिसेंबरच्या आत अर्ज करायचा आहे.

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 19 डिसेंबरला ॲडमिट कार्ड मिळणार आहे. तर जानेवारी 2021 मध्ये परीक्षा होणार आहे. 50 जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. यामध्ये 20 जागा जनरल कॅटेगरीसाठी, 14 ओबीसीसाठी, 8 अनुसूचित जाती तर 5 ईडब्ल्यूएस आणि 3 एसटी प्रवर्गासाठी आरक्षित आहेत.

अर्ज दाखल करण्याची तारीख : 30 नोव्हेंबर

अर्ज करण्याचा शेवटचा दिवस : 7 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत

ऍडमिट कार्ड प्रिंट करण्याची तारीख- 19 ते 25 डिसेंबर

परीक्षेची तारीख- जानेवारी 2021

विभागवार निवड झालेल्यांची यादी- मार्च 2021

INS Chilka मध्ये जाण्याची तारीख : एप्रिल 2021

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2021 रोजी 18 ते 22 वर्षापर्यंत असावे.

अर्ज करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

उमेदवार राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडून मान्यताप्राप्त बोर्डमधून कमीतकमी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेला असावा. तर अनुसूचित जाती आणि जमातीमधील उमेदवारांना 5 टक्क्यांची सूट दिली जाणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावर कोणत्याही स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकावर विजय मिळवलेल्या उमेदवारांना देखील स्पोर्ट्स कोट्यातून ही सूट मिळणार आहे.

Published by: Shreyas
First published: December 3, 2020, 12:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या