भारतीय सैन्यात (Indian Army) विविध पदांसाठी भरतीमोहीम (Recruitment) सुरू झाली असून, या वेळी ऑनलाइन नावनोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. ज्यांना भारतीय सैन्यात नोकरी करण्याची इच्छा आहे, त्यांनी joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करणं आवश्यक आहे. सैनिक (Soldier), लिपिक (Clerk), स्टोअर कीपर (Store Keeper) टेक्निकल, सोल्जर टेक्निकल (Soldier Technical), टेक्निकल (एव्हिएशन ‘एक्स’ ग्रुप), नर्सिंग असिस्टंट आणि पशुवैद्यकीय विभागात नर्सिंग असिस्टंट अशा विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. उमेदवारांना केवळ एकाच विभागातील पदासाठी अर्ज करता येणार आहे.
वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या तारखांना ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांसाठी अर्ज करण्याची तारीखही वेगवेगळी आहे.
महत्वाच्या तारखा :
पंजाबः 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2021
हरियाणा: 14 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2021
आंध्र प्रदेशः 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2021
गुजरातः 5 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2021
देशातील कोविड-19 परिस्थितीमुळे या तारखांमध्ये आणि ठिकाणांमध्येही बदल होऊ शकतो.
हे वाचा - Job Alert : राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिकमध्ये विविध जागांसाठी पदभरती
ठिकाणे आणि तारीख :
पंजाब(Punjab) :
फतेहगड साहिब, बरनाला, मानसा, संगरूर आणि पतियाळामधील लोकांसाठी 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान पतियाळा इथल्या 1 एडीएसआर मैदानावर (फ्लाइंग क्लबच्या समोर, पटियाला-संगरूर रोड)भरती प्रक्रिया पार पडेल.
हरियाणा (Haryana) :
भिवानी,चरखी दादरी, महेंद्रगड आणि रेवाडी जिल्ह्यातील लोकांसाठी भिवानी इथल्या भीम स्टेडियमवर 14 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत भरती होईल.
आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) :
श्रीकाकुलम, विजयनगरम, विशाखापट्टणम, पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, कृष्णा आणि यनम जिल्ह्यातील लोकांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, विशाखापट्टणमच्या इंदिरा प्रियदर्शिनी स्टेडियमवर हा कार्यक्रम होणार आहे.
गुजरात (Gujrat) :
आणंद, वलसाड, तापी, डांग, नवसारी, साबरकांठा, वडोदरा, मेहसाणा, सूरत, बनसकांठा, नर्मदा, महिसागर, अहमदाबाद, गांधीनगर, अरवली, छोटा उदयपूर, भरूच, खेडा, दाहोद, पंचमहाल जिल्ह्यासह दमण, दादरा आणि नगर हवेली केंद्र शासित प्रदेशातील लोकांसाठी हा भरती कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. गोधरा, पंचमहाल इथल्या कानेलव स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये हा कार्यक्रम होणार आहे.
सध्याच्या कोरोना काळात नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण मुलांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Indian army, Jobs